पुणेकरांनो महत्वाची बातमी ! चांदणी चौकात पादचारी मार्ग बांधणार

पुणेकरांनो महत्वाची बातमी ! चांदणी चौकात पादचारी मार्ग बांधणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बहुचर्चित चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उड्डाणपूल आणि रस्त्याचे जाळे उभारण्यात आले. मात्र, यामध्ये पादचार्‍यांचा विचार करण्यात आला नाही. या समस्येवर दैनिक मपुढारीफने प्रकाश टाकल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महापालिका प्रशासनाला जाग आली असून, 25 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी पादचारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 ऑगस्ट रोजी झाले. या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या जाळ्यासाठी सुमारे हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले.

संबंधित बातम्या : 

मात्र, या उड्डाणपुलावरून होणारी वाहतूक व नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांची पाहणी करून दैनिक मपुढारीफने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. या प्रकल्पाचे काम करताना पादचार्‍यांचा विचारच करण्यात आला नसल्याने त्यांना जीव मुठीत घेऊन वाहनांशी लपंडाव खेळत रस्ता ओलांडावा लागत असल्याचे उजेडात आणले. चांदणी चौकात बावधन, पाषाण, कोथरूड, वारजे या भागांतील सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. बस, रिक्षामधून उतरल्यानंतर या नागरिकांना महामार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे पादचार्‍यांसाठी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली. याची दखल घेत एनएचआयने पादचार्‍यांसाठी पादचारी मार्ग तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर आता एनएचएआय आणि महापालिकेने संयुक्तरीत्या पादचार्‍यांना येणार्‍या अडचणींचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार या ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात येणार असून, या कामासाठी महापालिका 15 कोटी आणि एनएचएआय 10 कोटी रुपये खर्च करणार आहे.

आराखड्यानुसार ही कामे होणार
्रचौकात पादचार्‍यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा, यासाठी चार किलोमीटरचे पदपथ तयार करण्यात येणार.
रस्ता ओलांडण्यासाठी एक पूल असेल.
तो सर्व रस्त्यांवरून येणार्‍या पदपथांना जोडला जाणार.
आवश्यकतेनुसार जिने तयार केले जाणार.
ठिकठिकाणी दिशादर्शक फलक उभारणार.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news