

पौड: मुळशी तालुक्यातील पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटात अत्यंत चुरशीची व तुल्यबळ लढत होत आहे. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग््रेास यांच्यातील सामना रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटावर मागील दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला होता. त्यामुळे यंदा शिवसेना विजयाची हॅट्रिक साधणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग््रेासचे आमदार शंकर मांडेकर यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी मतदार उभे राहणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
या गटात विजय मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग््रेासचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप आणि काँग््रेास पक्ष मैदानात उतरले आहेत. एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हा गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने उमेदवारीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळाली.
शिवसेनेचे मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे हे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते; मात्र त्यांना अंबडवेट गणातील पंचायत समितीसाठी संधी देण्यात आली. शिवसेना (उबाठा) कडून जिल्हा परिषदेसाठी अविनाश बलकवडे रिंगणात उतरले आहेत.
राष्ट्रवादी काँग््रेासकडून युवा नेते मिलिंद वाळंज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी सभापती रवींद्र ऊर्फ बाबा कंधारे व किसन नागरे यांची संभाव्य बंडखोरी रोखण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले. परंतु, किसन नागरे हे अंबडवेट गणातून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा ठोंबरे यांचे पती विनायक ठोंबरे निवडणूक लढवत आहेत. काँग््रेास पक्षाकडून पौड गावातील सामाजिक कार्यकर्ते रमेश पानसरे तर राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडून हाडशी येथील ज्ञानेश्वर आखाडे रिंगणात आहेत. शिवसेने (शिंदे) कडून कुळे येथील भाऊ आखाडे निवडणूक लढवित आहेत.
शिवसेनेची हॅट्ट्रिक होणार का?
पौड-अंबडवेट गटात सहा उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग््रेास यांच्यातच होणार असल्याचे चित्र आहे. मागील दोनवेळा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. यंदा विजयाची हॅट्ट्रिक शिवसेना करणार की आमदारकीचा लाभ घेत राष्ट्रवादी काँग््रेास बाजी मारणार, हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार.