Maharashtra Tobacco Government Offices: जुन्नरच्या शासकीय कार्यालयांत तंबाखूच्या पिचकाऱ्यांचा सुळसुळाट; स्वच्छतेच्या दाव्यांना तडा

तंबाखूमुक्त कार्यालयांचे फलक एका बाजूला, तर भिंती आणि जिने गुटख्याच्या डागांनी विद्रूप; नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी
Tobacco Government Offices
Tobacco Government OfficesPudhari
Published on
Updated on

ओतूर: एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान आणि तंबाखूमुक्त कार्यालयांची घोषणा करत असताना, दुसरीकडे जुन्नर तालुक्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्येच या नियमांचा उघडपणे भंग होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. कार्यालयाच्या परिसरात तंबाखू, गुटखा खाऊन खिडकीतून पिचकार्‍या मारणे, जिने व कोपरे रंगवणे असे प्रकार सर्रास सुरू असून, यामुळे शासकीय कार्यालयांची स्वच्छता धोक्यात आली आहे.

Tobacco Government Offices
Pune Footpath Encroachment: पदपथ नागरिकांसाठी की बांधकाम व्यावसायिकांसाठी? पुणेकरांचा संतप्त सवाल

कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छ भिंतींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, कार्यालय प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच हे प्रकार घडत असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Tobacco Government Offices
Pune Monsoon Preparedness Drainage Problem: बाणेर–औंधमध्ये ९० टक्के पावसाळापूर्व कामांचा दावा; तरीही पाणी तुंबण्याची भीती कायम

'सामान्य नागरिकाने असा प्रकार केल्यास तातडीने दंड आकारला जातो; मग कर्मचाऱ्यांना मोकळीक का?' असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे क्षयरोग (TB), फ्ल्यू आणि इतर विषाणूजन्य संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. अशा अस्वच्छ सवयींमुळे शासकीय कार्यालये आजारांची केंद्रे बनण्याची भीती निर्माण झाली आहे.

Tobacco Government Offices
Indian Olympic Association Karate Ban: कराटे इंडिया ऑर्गनायझेशनला IOAचा दणका; राष्ट्रीय स्पर्धेला बंदी

कायद्याचा धाक कागदावरच?

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे हा सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा (COTPA) २००३ नुसार दंडनीय अपराध आहे. भारतीय न्याय संहिता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसारही दंडात्मक कारवाईची तरतूद आहे; मात्र, स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने हे नियम केवळ कागदावरच उरले आहेत की काय, अशी स्थिती आहे.

Tobacco Government Offices
Pune Rave Party Raid: तुळापूरमधील ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टीवर गुन्हे शाखेचा छापा; १५६ जणांची चौकशी, अमली पदार्थ जप्त

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

  • संपूर्ण कार्यालय परिसर तातडीने 'तंबाखूमुक्त क्षेत्र' घोषित करावा.

  • शासकीय कार्यालयांत सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवावी.

  • नियमभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक तसेच निलंबनाची कारवाई करावी.

  • शासनाने केवळ स्वच्छता अभियानाचे फलक न लावता, नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news