Pune News : कोजागरीसाठी पुण्यातील उद्याने आज रात्री बारापर्यंत सुरू राहणार

Pune News : कोजागरीसाठी पुण्यातील उद्याने आज रात्री बारापर्यंत सुरू राहणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक परिसरातील बागा आणि उद्यानांमध्ये जमा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व उद्याने आज (शनिवारी) रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत 211 उद्याने, मत्स्यालय व प्राणिसंग्रहालये विकसित करण्यात आली आहेत. या सर्वांच्या देखभाल दुरुस्तीचे काम उद्यान विभागामार्फत करण्यात येते. या उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक येतात तसेच कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उद्यानांमध्ये येतात.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागरीसाठी महापालिकेची उद्याने शनिवारी रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सारसबाग, डेक्कन परिसरातील छत्रपती श्री संभाजी महाराज उद्यान, मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका उद्यान, कोथरूड येथील थोरात उद्यान, सोमवार पेठेतील शाहू उद्यान, कमला नेहरू उद्यान, हडपसरमधील लोहिया उद्यान, सहकारनगरमधील काकासाहेब गाडगीळ उद्यान यांसह त्या-त्या भागातील उद्याने खुली ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news