जगातील सर्वात छोटे पार्टिकल अ‍ॅक्सलेरेटर

जगातील सर्वात छोटे पार्टिकल अ‍ॅक्सलेरेटर

लंडन : संशोधकांनी नुकतेच जगातील सर्वात लहान पार्टिकल अ‍ॅक्सलेरेटर पहिल्या वेळेस फायर केले. हे यंत्र एखाद्या छोट्याशा नाण्याइतक्या आकाराचे आहे हे विशेष. या नव्या संशोधनामुळे अनेक क्षेत्रांशी संबंधित नवी दालने खुली होऊ शकतात. त्यामध्ये मानव रुग्णांच्या शरीरात असे छोटे पार्टिकल अ‍ॅक्सलेरेटर वापरण्याच्या द़ृष्टीनेही नवे दालन खुले होऊ शकते.

या नव्या यंत्राला 'नॅनोफोटॉनिक इलेक्ट्रॉन अ‍ॅक्सलेरेटर' (एनईए) नाव आहे. त्यामध्ये एक मायक्रोचिप असून तिच्यामध्ये अतिशय सूक्ष्म अशी व्हॅक्यूम ट्यूब आहे. हजारो सूक्ष्म अशा स्तंभांनी ती बनलेली आहे. या स्तंभांवर मिनी लेसर बीम्स फायर करून संशोधक इलेक्ट्रॉन्स अ‍ॅक्सलेरेट करू शकतात. मुख्य अक्सलेरेशन ट्यूब ही अवघी 0.02 इंच लांबीची आहे. ती स्वित्झर्लंडमधील सर्नच्या लार्ज हैड्रॉन कोलायडर (एलएचसी) मधील 27 किलोमीटर लांबीच्या रिंगच्या तुलनेत 54 दशलक्ष पटीने लहान आहे.

सर्नमधील हे उपकरण जगातील सर्वात शक्तिशाली आणि मोठे पार्टिकल अ‍ॅक्सलेरेटर आहे. त्याच्या सहाय्याने हिग्ज बोसॉन किंवा देवकण (गॉड पार्टिकल), घोस्टली न्युट्रिनोस, चार्म मेसोन आणि मिस्टेरियस एक्स पार्टिकल्स अशा अनेक कणांचा शोध लावण्यात आला. आता या सूक्ष्म यंत्राची चर्चा आहे. त्याबाबतची माहिती 'नेचर' या नियतकालिकात देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news