

पुणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी पुण्याजवळ अत्याधुनिक पर्यटन केंद्र सुरू करण्यात येणार असून, तेथे त्यांना चार दिवसांकरिता विनाशुल्क राहण्याची सुविधा पुरविण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च तंत्रशिक्षण व संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.
कोथरूड येथील सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या क्लब हाऊसचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, दीपक पोटे, जयंत भावे, पुनीत जोशी, अॅड. मिताली सावळेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोसायटीचे अध्यक्ष नागेश नलावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पाटील म्हणाले की, राज्य सरकारने 75 वर्षे वयावरील ज्येष्ठांसाठी एसटीचा प्रवास मोफत केल्यानंतर ज्येष्ठांची संख्या प्रचंड वाढली. ज्येष्ठांनाही पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी पुण्यापासून दहा किलोमीटरवर महाबळेश्वरसारखे पर्यटन स्थळ सुरू करण्याची कल्पना पुढे आली. या ठिकाणी मनोरंजनाबरोबरच पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस अशा विविध इनडोअर गेमच्या सुविधाही मोफत उपलब्ध करण्यात येणार आहेत. 60 ते 70 जणांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी असणार आहे. रेश्मा पित्रे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सचिव अतुल जोशी यांनी आभार मानले.
हेही वाचा