Pune : पालखी मार्गाचे काम संथ गतीने; चालक हैराण

Pune : पालखी मार्गाचे काम संथ गतीने; चालक हैराण
Published on
Updated on

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा :  बारामती ते भवानीनगर-इंदापूरदरम्यान संत श्रीतुकाराम महाराज पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालक व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत. पालखी मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काम करताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्यामुळे लिमटेक ते भवानीनगर परिसरात आतापर्यंत चार ते पाच वाहनचालकांचा अपघाती मृत्यू झाला. लिमटेकपासून भवानीनगरपर्यंत ठिकठिकाणी पालखी मार्गाचे काम सुरू आहे. मासाळवाडी येथे मागील एक महिन्यापासून मार्गालगतची गटारे खोदून ठेवली आहेत. या गटाराचे काम अपूर्ण काम असून, त्यातील लोखंडी गज वर आलेले आहेत. या गटारात वाहने जात असून, मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

अशा कामामुळे स्थानिकांसह वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. लिमटेकपासून जंक्शनपर्यंत 2 किलोमीटरचेदेखील पालखी मार्गाचे सलग काम झालेले नाही. पालखी मार्गाचे काम दर्जेदार होत नाही. लिमटेक ते पाटसचे काम हे लिमटेक ते भवानीनगरदरम्यानच्या कामाच्या नंतर सुरू होऊनदेखील पूर्ण झाले; परंतु लिमटेक ते भवानीनगरपर्यंतचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. लिमटेक ते भवानीनगर सुरू असलेल्या कामाच्या ठेकेदाराकडून काम मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे.

पालखी मार्गाच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा वापर करण्यात आलेला आहे. या कामांमध्ये वापरण्यात येणारी हायवा वाहने ही ओव्हरलोड व बेजबाबदारपणे चालक चालवित आहेत. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडेदेखील तक्रार करण्यात आलेली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news