पुणे : वाहनचालकांवरील थकीत दंड तडजोडीने होणार कमी

पुणे : वाहनचालकांवरील थकीत दंड तडजोडीने होणार कमी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांसाठी मदत केंद्र सोमवारपासून (28 ऑगस्ट) सुरू करण्यात येणार आहे. वाहनचालकांवर असलेला थकीत दंड तडजोडीत कमी करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी येरवडा येथील वाहतूक उपायुक्त कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून 9 सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीत तडजोडीने प्रलंबित खटले तडजोडीने मार्गी लावण्यात येतात. वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. थकीत दंडाची रक्कम कमी करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णकि यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून वाहनचालकांसाठी मदत केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहे. वाहनचालकांनी या सुविधेचा लाभ घेऊन तडजोडीत दंड कमी करून घ्यावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

येरवडा येथील वाहतूक शाखेच्या उपायुक्त कार्यालयात सोमवारपासून (दि. 28) वाहनचालकांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत मदत केंद्राचे कामकाज सुरू राहणार आहे. प्रलंबित खटला, थकीत दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. वाहनचालकांना दंडाच्या रकमेतून सूट देण्यात येणार आहे, असे मगर यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news