Harishchandragad Trek Rescue: हरिश्चंद्रगड ट्रेकिंगमध्ये अडकलेले 7 तरुण-तरुणी सुखरूप; ओतूर पोलिसांची तत्पर बचावमोहीम

दाट धुके व पावसामुळे रस्ता चुकलेले ट्रेकर्स रात्री ११:३० वाजता सुखरूप बाहेर काढले; ग्रामस्थांचाही महत्त्वाचा सहभाग
Harishchandragad Trek Rescue
Harishchandragad Trek RescuePudhari
Published on
Updated on

ओतूर: हरिश्चंद्रगड परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या भिवंडी येथील सात तरुण-तरुणींचा जीव धोक्यात आला असताना ओतूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. खिरेश्वर गाव मार्गे हरिश्चंद्रगडावर ट्रेकसाठी गेलेले चार युवक आणि तीन युवती रस्ता चुकल्याने भरकटले होते. ओतूर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रात्रभर शोधमोहीम राबवत त्यांना सुखरूप बाहेर काढले.

Harishchandragad Trek Rescue
TET Paper Leak 2026: टीईटी पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द; राज्यभर उमेदवारांचा संताप उसळला

ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी येथील सात जण शनिवारी (दि. २७) सकाळी सुमारे १० वाजता हरिश्चंद्रगड ट्रेकसाठी गेले होते. ट्रेक पूर्ण करून सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परतीचा प्रवास सुरू केला; मात्र डोंगराळ भागातील दाट धुके, रिमझिम पाऊस आणि मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे त्यांचा रस्ता चुकला व ते जंगलात भरकटले.

Harishchandragad Trek Rescue
Pune Art Gallery Delay: कोथरूडमधील कलादालन १२ वर्षांपासून रखडले; खर्च २० कोटींवर, तरीही उद्घाटन नाही

परिस्थिती गंभीर होत असताना रात्री सुमारे ९ वाजता त्यांनी कसाबसा डायल ११२ वर संपर्क साधत मदतीची याचना केली. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत डायल ११२ पथकासह दोन पोलीस अंमलदार आणि दोन होमगार्ड यांना बॅटरी, रेनकोट आणि आवश्यक साहित्यांसह सरकारी वाहनातून घटनास्थळी रवाना केले.

Harishchandragad Trek Rescue
Pune Water Supply Crisis: पुण्यात पाणीटंचाई तीव्र; १५०० तक्रारी दाखल, ४०० खासगी टँकरद्वारे पुरवठा सुरू

दरम्यान, नेटवर्कचा अभाव आणि खराब हवामानामुळे संपर्कात अडथळे येत होते. अशा परिस्थितीत स्थानिक गावकरी, पोलीस मित्र आणि तंटामुक्ती समितीच्या सदस्यांच्या मदतीने शोधमोहीम अधिक वेगाने राबविण्यात आली. अखेर रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास सातही ट्रेकर्स भयभीत अवस्थेत सुखरूप आढळून आले. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे खाली आणून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Harishchandragad Trek Rescue
Pune CCTV Road Damage: पुण्यात CCTV प्रकल्पाचा फटका; २८ किमी रस्ते खोदले, फक्त ४० टक्के डांबरीकरण पूर्ण

ही संपूर्ण बचावमोहीम जिल्हा पोलिस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, शुभमकुमार आणि धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलिस उपनिरीक्षक संदीप आमणे, पोलिस जवान पवार, राठोड, श्याम जायभाये, होमगार्ड मोमीन, शिंदे, काळे तसेच पोलीस मित्र मारुती मेमाणे, बाळ पंडित आणि गौरव मेमाणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या धाडसी आणि वेगवान कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून ओतूर पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news