Pune CCTV Road Damage: पुण्यात CCTV प्रकल्पाचा फटका; २८ किमी रस्ते खोदले, फक्त ४० टक्के डांबरीकरण पूर्ण

शहरातील नागरिकांना खराब रस्त्यांचा त्रास कायम; प्रकल्पासाठी खर्च झालेल्या कोट्यवधींनंतरही यंत्रणांतील समन्वयाचा अभाव समोर
Development Work
Development WorkPudhari
Published on
Updated on

पुणे: शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाचा फटका आता थेट पुणेकरांना बसत आहे. कॅमेरे बसविण्यासाठी तब्बल २८ किलोमीटर रस्ते खोदण्यात आले; मात्र, काम पूर्ण होऊन वर्ष उलटत आले, तरी त्यापैकी केवळ ४० टक्के रस्त्यांवर डांबर किंवा काँक्रीटचे काम अर्थात रिसर्फेसिंग करण्यात आले आहे. उर्वरित खोदलेले रस्ते अद्याप पूर्ववत न झाल्याने नागरिकांना खड्डे, उखडलेले रस्ते आणि वाहतुकीच्या समस्यांचा रोज सामना करावा लागत आहे.

Development Work
Mula Mutha River Pollution: 749 कोटी खर्चूनही मुळा-मुठा प्रदूषित; निम्म्याहून अधिक सांडपाणी अजूनही थेट नदीत

नगरसेविका प्रियंका शेंडगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून ही बाब उघड झाली आहे. त्यानुसार, एप्रिल २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत पुणे महापालिकेने शहरात १,९९८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर २०२३ आणि २०२४ या काळात कसबा विधानसभा मतदारसंघात आमदार निधीतून आणखी २५२ सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

Development Work
Balbharati Class 6 Geography Textbook: बालभारती सहावी भूगोल पुस्तकात पर्यावरण व शाश्वत विकासावर भर

सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्यासाठी पोलिस प्रशासनाने २८ किलोमीटर रस्ते खोदण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली होती. पथ विभागाने ती मंजूर केली; मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असतानाही आजपर्यंत केवळ ४० टक्के रस्त्यांचेच रिसर्फेसिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित काम अद्याप प्रलंबित असल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.

Development Work
FYJC Admission Third Round: अकरावी प्रवेश तिसऱ्या फेरीत १.४९ लाख विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

त्यामुळे नागरिकांना खराब रस्त्यांचा त्रास किती काळ सहन करावा लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, महापालिकेने बसविलेल्या सीसीटीव्हींच्या देखभालीची जबाबदारी सुरुवातीची तीन वर्षे संबंधित ठेकेदाराकडे होती. त्यानंतर ही जबाबदारी पोलिस आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारी वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये विभागली गेल्याचे चित्र समोर आले आहे.

Development Work
Maharashtra Private Skill Universities Inspection: खासगी कौशल्य विद्यापीठांची तपासणी; 30 दिवसांत अहवाल सादर करणार समिती

यंत्रणांतील समन्वयाचा अभाव पुन्हा उघड

प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरातील सीसीटीव्हींचे मॅपिंग आणि नियंत्रणही पोलिस आयुक्तालयाकडेच आहे. मात्र, महापालिकेने रस्ते खोदण्यास परवानगी दिल्यानंतर त्यांची वेळेत दुरुस्ती न झाल्याने संबंधित यंत्रणांतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. शहराच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळेच नागरिकांना खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत असेल, तर या विलंबाला जबाबदार कोण, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news