Leopard Attack: ओतूरमध्ये बिबट्याचा हल्ला; १० वर्षीय मुलगी गंभीर जखमी

ग्रामीण रुग्णालय बंद असल्याने उपचारासाठी हेळसांड; वनविभागाविरोधात ग्रामस्थांचा संताप
Leopard Attack
Leopard AttackPudhari
Published on
Updated on

ओतूर: जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओतूर हद्दीतील जुन्या मांदारने रोडवरील वाकचौरे मळा येथे गुरुवारी (दि. २१) सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पाचवीत शिकणाऱ्या १० वर्षांच्या मुलीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात काव्या महेंद्र वाकचौरे (रा. वाकचौरे मळा, ओतूर) ही गंभीर जखमी झाली आहे.

Leopard Attack
Pune Scholarship Pending Applications: पुणे विद्यापीठात शिष्यवृत्तीचा खोळंबा; 12,500 हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ६ वाजण्याच्या वेळेस काव्या घराजवळ असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. मुलीच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करीत घटनास्थळी धाव घेतल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात काव्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leopard Attack
MHT CET 2026 Objection Window: सीईटी 2026 विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; प्रश्न-उत्तरांवर आक्षेप नोंदविण्याची प्रक्रिया सुरू

घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक सखाराम अहिनवे तसेच मुलीच्या पालकांनी वनविभागाला दिली असून वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leopard Attack
Pune Voter List Revision 2026: पुण्यात मतदार यादी सुधारणा मोहीम वेगात; निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

दरम्यान, वाकचौरे मळा परिसरात वारंवार बिबट्यांचा वावर वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leopard Attack
Maharashtra Sugarcane FRP Dues: साखर कारखान्यांकडे 934 कोटींची एफआरपी थकबाकी; शेतकऱ्यांना दिलासा की दिला नाही?

ओतूरचे ग्रामीण रुग्णालय बंदच; उपचारासाठी काव्याची हेळसांड

या हल्ल्यात काव्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, ओतूर येथील १४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय अद्यापही सुरू न झाल्याने जखमी मुलीच्या उपचारासाठी मोठी हेळसांड झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news