Otur Doctor House Theft: ओतूरमध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या बंद घरात धाडसी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

दोन दिवस घर बंद असल्याची संधी साधली; सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला, पोलिसांकडून तपास सुरू
Otur Doctor House Theft
Otur Doctor House TheftPudhari
Published on: 
Updated on: 

ओतूर: ओतूर येथे डॉक्टर दाम्पत्याचे बंद घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Otur Doctor House Theft
Pune Market Yard Vegetable Rates: पुणे बाजारात पाण्याच्या तुटवड्याचा परिणाम; मिरची, वांगी, शेवगा, घेवडा महागले

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर दाम्पत्य काही कामानिमित्त दोन दिवस पुण्याला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडली. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाट व इतर साहित्याची उचकापाचक केली. चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला असल्याची प्राथमिक खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

Otur Doctor House Theft
Chakan Vegetable Market Rates: पितृपंधरवड्यात चाकण बाजारात फळभाज्या-पालेभाज्या महागल्या; ५.९५ कोटींची उलाढाल

डॉक्टर दाम्पत्य रविवारी (दि. ४) रात्री ९ वाजता घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरवाजाची कडी तुटलेली व कपाटे फोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ ओतूर पोलिसांना माहिती दिली.

Otur Doctor House Theft
Pune Fish Chicken Rates: पुण्यात मासळी, चिकन महागले; सुरमई-पापलेटच्या दरात २० टक्के वाढ

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासह संशयितांच्या हालचालींची माहिती घेतली जात आहे, तसेच डॉगस्कॉडला पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Otur Doctor House Theft
Pune Water Tanker: पुण्यात पाऊस, धरणे भरली; तरी टँकरवरच मदार, आठ महिन्यांत २ लाख ३० हजार फेऱ्या

दरम्यान, ओतूर परिसरात बंद घरे हेरून चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी तातडीने छडा लावावा, तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून भरवस्तीत घडलेल्या या चोरीच्या घटनेने अवघी ओतूर नगरी हादरली आहे. याबाबत ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांचे मार्गदर्शनात या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news