Pune Fish Chicken Rates: पुण्यात मासळी, चिकन महागले; सुरमई-पापलेटच्या दरात २० टक्के वाढ

गणेशोत्सवानंतर सामिष पदार्थांना वाढती मागणी; चिकन किलोमागे ३० रुपये महाग, मटणाचे दर स्थिर
Fish
Fish Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: गणेशोत्सवानंतर मासळी, मटण आणि चिकनला वाढलेली मागणी सलग दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. पुढील आठवड्यात नवरात्रोत्सव सुरू होत असल्याने सामिष पदार्थांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मासळीमध्ये सुरमई व पापलेटचे भाव २० टक्क्यांनी, तर हलव्याचे भाव १० टक्क्यांनी वाढले आहेत.

Fish
Pune Water Tanker: पुण्यात पाऊस, धरणे भरली; तरी टँकरवरच मदार, आठ महिन्यांत २ लाख ३० हजार फेऱ्या

अन्य मासळीचे दर स्थिर आहेत. उष्णतेमुळे पक्ष्यांच्या वाढीवर परिणाम झाला असून, बाजारातील आवक सुमारे २० टक्क्यांनी घटली आहे. मागणी अधिक असल्याने चिकन किलोमागे ३० रुपयांनी महागले आहे. मटणाचे दर स्थिर आहेत. गावरान अंडी शेकड्यामागे ५० रुपये, तर इंग्लिश अंडी पाच रुपयांनी महागली आहेत.

Fish
Sugar Factory Loan Investigation: सहा साखर कारखान्यांच्या ५६४ कोटींच्या कर्जाची फेरतपासणी; मातब्बर नेत्यांशी संबंधित कारखाने रडारवर

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. ४) खोल समुद्रातील मासळी २०ते २५ टन, खाडीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून २० ते २५ टन इतकी आवक झाली.

Fish
Pune MPSC Student Protest: पुण्यात MPSC आंदोलनाला तिसरी फूट; ऑब्जेक्टिव्ह विरुद्ध डिस्क्रिप्टिव्हवरून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १८००-२२००, मोठे : १८००-२०००, मध्यम : १२००-१४००, लहान : ९००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६००-७००, सुरमई ४००-९००, रावस : ८००-९००, घोळ : ८००-९००, करली : ३००-४००, भिंग : ३००-४००, पाला : १२००-१५००, वाम : पिवळी ९००-१०००, काळी : ४००-४००, ओले बोंबील : १००-१८०. कोळंबी : लहान : १६०-२००, मध्यम : ३००-४००, मोठी : ५००-७००, जम्बो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : २०००-२४००, मोरी : २५०-४००, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २००-२८०, खेकडे : ३५०-४००, चिंबोर्‍या : ७००.

Fish
Pune District Bank Election: शिरूरमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढली; १३१ ठरावांमुळे इच्छुकांची संख्या वाढली

खाडीची मासळी - सौंदाळे : २५०-३००, खापी : २००-२५०, नगली : ४००-५००, तांबोशी : ५००-६००, पालू : ३००-३५०, लेपा : २००-२५०, बांगडा : २००-२८०, शेवटे : २००-२५०, बेळुंजी : १२०-१८०, तिसर्‍या : २५०-३००, खुबे : १२०-१६० तारली : ३००-३५० नदीतील मासळी : रहू : १४०-१८०, कतला : १८०-२२०, मरळ : ३००-४००, शिवडा : २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : २५०-४००, वाम : ३५०-४५०. मटण : बोकडाचे ८४०, बोलाईचे ८४०, खिमा ८४०, कलेजी ८८०. चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १७०, बोनलेस ३५०. अंडी : गावरान (शेकडा) १२१० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ५८०, डझन ७८, प्रतिनग ६.५०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news