

अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये पितृपंधरवड्यामुळे फळभाज्या व पालेभाज्या महागल्या आहेत. पालेभाज्यांची भरपूर आवक होऊनही भाव तेजीत राहिले आहेत. एकूण उलाढाल ५ कोटी ९५ लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ९०० क्विंटल झाली. कांद्याला कमाल भाव १,६०० ते ४,६५० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १,७५० क्विंटल झाली. बटाट्याला कमाल भाव ८०० ते १,८०० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक ७० क्विंटल झाली. लसणाला कमाल भाव १८ हजार रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक २५५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव : कांदा - एकूण आवक - ९०० क्विंटल. भाव क्र. १- ४,६५० रुपये, भाव क्र. २- ३,६०० रुपये, भाव क्र. ३- १,६०० रुपये. बटाटा- एकूण आवक- १,७५० क्विंटल. भाव क्र. १- १,८०० रुपये, भाव क्र. २- १,००० रुपये, भाव क्र. ३- ८०० रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव : टोमॅटो - ४१३ क्विंटल (१,००० ते २,००० रुपये), कोबी - ३३५ क्विंटल (४०० ते ६००), फ्लॉवर - २१० क्विंटल (१,००० ते १,८००), वांगी - ९२ क्विंटल (२,००० ते ३,०००), भेंडी - ९६ क्विंटल (२,५०० ते ४,५००), दोडका - ६२ क्विंटल (२,५०० ते ३,५००), कारली - ८४ क्विंटल (२,००० ते ३,०००), दुधीभोपळा - ५२ क्विंटल (१,००० ते २,०००), काकडी - ८५ क्विंटल (२,००० ते ३,०००), फरशी - २६ क्विंटल (३,००० ते ४,५००), वालवड - ५२ क्विंटल (३,००० ते ५,०००), ढोबळी मिरची - ११४ क्विंटल (२,००० ते ३,५००), चवळी - ३२ क्विंटल (२,००० ते ३,५००), शेवगा - ३० क्विंटल (४,००० ते ६,०००), गाजर - १८० क्विंटल (१,५०० ते २,५००), गवार - ५६ क्विंटल (३,००० ते ७,०००), आले - १५२ क्विंटल (७,००० ते १३,०००), वाटाणा - ४० क्विंटल (६,००० ते ९,०००), भुईमूग शेंगा - १०५ क्विंटल (४,५०० ते ५,५००)
पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये आणि भाज्यांना मिळालेले भाव : मेथी - एकूण १६ हजार ५४५ जुड्या (७०० ते २,००० रुपये), कोथिंबीर - एकूण २८ हजार ५४० जुड्या (४०० ते १,०००), शेपू - एकूण ४ हजार ७३५ जुड्या (६०० ते १,०००), पालक - एकूण ५ हजार ३९८ जुड्या (५०० ते १,००० रुपये).