किरकटवाडीत फुलली अफूची शेती; दोघांना अटक

किरकटवाडीत फुलली अफूची शेती; दोघांना अटक
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत बेकायदा अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने उजेडात आणला आहे. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून 14 किलो अफूची बोंडे जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तानाजी शांताराम हगवणे (वय 48), शिवाजी बबन हगवणे (वय 55, दोघे रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किरकटवाडीतील नांदोशी रस्त्यावर इंद्रप्रस्थ सोसायटीजवळ आरोपी हगवणे यांची शेती आहे. शेतात बेकायदा अफूची लागवड केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि हवेली पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. हगवणे यांनी शेतात अफूची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने 14 किलो अफूची बोंडे जप्त केली. जप्त केलेल्या अफूच्या बोडांची किंमत 28 हजार 700 रुपये आहे.

दोघांविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक राहुल वांगडे, विकास अडागळे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, दत्ता तांबे, दगडू विरकर, दिलीप आंबेकर, अशोक तारू यांनी ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे, अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात अफू लागवड करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिले होते. सासवड परिसरातील कोडीत गावात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड केल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला होता. या कारवाईत पोलिसांनी दहा किलो 500 ग्रॅम वजनाची अफूची बोंडे जप्त केली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news