अजब कारभार ! मंजुरीपूर्वीच हॉस्पिटलचे भूमिपूजन | पुढारी

अजब कारभार ! मंजुरीपूर्वीच हॉस्पिटलचे भूमिपूजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीचा अंतिम आराखडा मंजूर होण्यापूर्वीच स्थायी समितीने प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. एस्टिमेट कमिटीचीही मान्यता घेण्यात आलेली नसतानाही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. हॉस्पिटल उभारणारी कंपनी आणि महापालिकेमध्ये ट्राय पार्टी करार झालेला नसताना रविवारी (दि. 10 मार्च) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. महापालिकेच्या वारजे येथील जागेवर डीबीओएफटी तत्त्वावर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. यासाठी मागविलेल्या निविदेला फेब्रुवारी 2023 मध्ये मंजुरी देण्यात आली. रुरल एन्हान्सर्स एलएलपी या कंपनीला हे काम देण्यात आले. सल्लागार कंपनीने हॉस्पिटल उभारणीचा आणि खर्चाचा विकास आराखडा तयार केला आहे.

या प्रकल्प अहवाल अंतिम होण्यापूर्वीच स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आल्याचे समोर येत आहे. महापालिकेने लोकनियुक्त स्थायी समिती आणि मुख्य सभेत मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार पाठविलेल्या पत्रानुसार राज्य शासनाने 18 ऑगस्ट 2022 ला हॉस्पिटल उभारणीला मंजुरी दिली. तसेच ठेकेदार कंपनीने विदेशी बँकेचे कर्ज घेतल्यास त्याचा विमा काढण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर राहील, राज्य शासनाची यामध्ये कुठलीही जबाबदारी राहाणार नाही. यासाठी विदेशी बँक अथवा फायनान्स कंपनी, विमा कंपनी आणि महापालिका असे ट्राय पार्टी करार करण्याचे आदेश दिले आहेत. ट्राय पार्टी कराराच्या मसुद्यात विधी विभागाकडून अनेक बदल सुचविण्यात आले आहेत.

हेही वाचा

Back to top button