पुणे : पुढरी वृत्तसेवा
वनप्लस लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनचे नाव वनप्लस नॉर्ड CE 2 5G असे आहे. या स्मार्टफोन ची किंमत २४ हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. कंपनी हा स्मार्टफोन ११ फेब्रुवारी पर्यंत लॉन्च करेल, असा दावा सोशल मीडिया वर केला जात आहे.
या स्मार्टफोन चे वैशिष्ट्य म्हणजे याला ६.४ इंच फुल एचडी स्क्रीन असून 'अमोलेड डिस्प्ले' सुद्धा आहे. हा डिस्प्ले ९० एचझेडच्या रीफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह देण्यात आला आहे. कंपनीने या फोनला १२ जीबी रॅम सह १२८ जीबी आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटमध्ये दिले आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी ९०० चिपसेट देखील दिला जाऊ शकतो.
कॅमेऱ्याबद्दल बोलाचे झाले तर मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोटोग्राफीच्या शौकीनांसाठी या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ६४-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह ८-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स समाविष्ट आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
वनप्लस या स्मार्टफोनमध्ये ४५००mAh बॅटरी असून या बॅटरीची जलद चार्जिंग क्षमता आहे. हा स्मार्टफोन दोन रंगांमध्ये उपलब्ध असून काळा आणि ग्रे या रंगांमध्ये कंपनी त्याला लॉन्च करणार आहे.