लूप रोडवर अडथळ्यांची शर्यत : नागरीक त्रस्त 

लूप रोडवर अडथळ्यांची शर्यत : नागरीक त्रस्त 
Published on
Updated on
येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  लूप रोड परिसरात बीडी कामगार वसाहतीसमोरील पादचारी मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. भाजी विक्रेत्यांनी या मार्गावर अतिक्रमणे केली असून, या ठिकाणी काही महिन्यांपासून अनेक वाहने उभी केली आहेत.  तसेच या पदपथावर सांडपाणी वाहिनीचे सिमेंटचे पाईप ठेवले आहेत, यामुळे आम्ही चालायचे तरी कोठून? असा सवाल पादचार्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.
या पादचारी मार्गावर सध्या विविध अडथळे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा साचल्याचे चित्रही दिसून येत आहे. पादचारी मार्गवर जुनी वाहने अनेक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. काही ठिकाणी पादचारी मार्गावर खोदकाम केल्याचे दिसून येत आहे. परिसरात कचर्‍याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली आहे.  या मार्गावर ठिकठिकाणी भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच सांडपाणी वाहिनीचे सिमेंटचे पाईप देखील या पदपथावर ठेवण्यात आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पंडित जवाहरलाल नेहरू केंद्रादरम्यान पादचारी मार्गावर जुनी वाहने अनेक महिन्यांपासून उभी आहेत. या पदपथावरील विविध समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रहिवासी अन्वर पठाण म्हणाले की,या पादचारी मार्गावरील विविध समस्या दूर करण्याचे काम महापालिका व वाहतूक पोलिसांचे आहे. दोन्ही विभागांच्या अधिकार्‍यांशी याबाबत संपर्क केल्यावर ते एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
या पादचारी मार्गावरील विविध समस्यांची पाहणी करून त्या दूर करण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येतील. तसेच अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात येईल.
– विजय नाईकल, सहायक आयुक्त,  येरवडा क्षेत्रीय कार्यालय
या रस्त्यावरील पदपथावर उभी असलेली वाहने उचलणे हे महापालिका प्रशासनाचे काम आहे. ते त्यांच्याकडून होणे अपेक्षित आहे.
– शैलेश संखे, वरिष्ठ निरीक्षक,  येरवडा वाहतूक विभाग
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news