शहरात उंच इमारती बांधण्याचे प्रमाण वाढत आहे. 24 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावरील तसेच सर्व निकषांची पूर्तता करत असलेल्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी दिली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत चार प्रस्तावांना मान्यता दिली आहे. या बांधकाम प्रकल्पांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणी करून या पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे.– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका