Pune : शहराच्या तापमानात घट; आगामी 3 ते 5 दिवस थंडीचे | पुढारी

Pune : शहराच्या तापमानात घट; आगामी 3 ते 5 दिवस थंडीचे

पुणे : शहराच्या किमान तापमानात सोमवारी अचानक 5 ते 7 अंशांनी घट झाली. गेले पाच दिवस शहराचे तापमान 15 ते 21 अंशांवर गेले होते. आगामी तीन ते पाच दिवस शहरात थंडी जास्त जाणवणार आहे. उत्तर भारतात थंडीची लाट अतितीव्र झाली आहे.त्यामुळे त्या भागातून शीतलहरी राज्यात येण्यास सोमवारी 15 जानेवारी पासून संक्रांतीच्या दिवशी सुरुवात झाली. गेले पाच ते सहा दिवस शहराचा पारा 15 ते 21 अंशांवर गेला होता.  सोमवारी एनडीए परिसराचा पारा 10.6 अंशांवर आला. तेथील तापमान दोन दिवसांपूर्वी 18 अंशांवर होते. तर शिवाजीनगर 18 वरून 12.2 अंशांवर खाली आले आहे. तसेच पाषाणचा पारा 17 वरून 12.4 अंशांवर खाली आला.

आगामी तीन ते पाच दिवस थंडीचे..

शहरात सोमवारी दिवसभर कडक उन्ह होते. मात्र सायंकाळी सातनंतर गारठा सुटला. तापमानात घट झाली. पारा 10 ते 12 अंशांवर खाली आला. उत्तर भारतातून शीतलहरी शहरात आल्याने हा परिणाम झाला आहे. आगामी तीन ते पाच दिवस शहराचे किमान तापमान 12 अंशांवर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा

Back to top button