Nirmala Nawale : वटपौर्णिमेनिमित्त सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या निर्मला नवले आहेत तरी कोण?
Nirmala Navale viral video
पुढारी आनलाईन डेस्क : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या व कारेगावच्या संरपच निर्मला नवले यांनी वटपोर्णिमेनिमित्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने त्या चर्चेचा विषय ठरल्या. “वटपौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त, आपली नाती वटवृक्षाप्रमाणे बळकट व्हावी, अशी प्रार्थना!” असे कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ इन्स्ट्राग्रामवर शेअर केला. (Nirmala Nawale)
कोण आहेत निर्मला नवले
निर्मला शुभम नवले या अजित पवार गटाच्या नेत्या व पुण्यातील कोरेगाव (ता. शिरूर, जिल्हा पुणे) येथील संरपंच आहेत. त्यांचे शिक्षण बी.ई. (IT इंजिनिअर) झाले असून त्या गावपातळीवर काम करत आहेत. त्यांनी २०२१ मध्ये बिनविरोध सरपंचपदाची निवडणूक जिंकली. त्या सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असून त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या इंन्स्ट्राग्राम अकाउंटवर ४.३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या फोटोमुळे त्या युवा वर्गात लोकप्रिय आहेत. दरम्यान गावात महिलांसाठी विशेष योजना राबवणं, स्वच्छता मोहिमा, ग्रामविकासाचे निर्णय घेणं, यामुळे एक सक्षम संरपंच त्या प्रसिद्धीच्या झोत्यात आल्या. त्यांची लोकप्रियता पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना राष्ट्रवादी युवती क्राँग्रेसच्या कार्याध्यक्षा म्हणून त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली. (Nirmala Nawale)

