Viral Video | काही विवाह भयानक असतात...; पत्नीने नवऱ्याला गाडीवरच चप्पलने चोपलं, व्हिडिओ व्हायरल

wife hits husband on bike | लखनौमध्ये पत्नीने बाईकवर जात असताना नवऱ्याला चपलेने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Lucknow viral video, wife hits husband on bike
Lucknow viral video, wife hits husband on bikefile photo
Published on
Updated on

wife hits husband on bike Viral Video |

लखनऊ : लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांना फक्त प्रेमच देतात, अस जर तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी वाचाच... उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पती-पत्नी दुचाकीवरून प्रवास करत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, पती आपल्या पत्नीला त्याच्या बाईकवरून कुठेतरी घेऊन जात आहे... व्हिडिओ इथेच संपत नाही, कॅमेरा जसजसा जवळ जातो तसतसे जे पाहाल ते धक्कादायक...!

नवरा दुचाकी चालवत असताना पत्नीने चप्पलने चोपलं

व्हिडिओमध्ये, पती दुचाकी चालवत आहे. त्याची पत्नी त्याच्या मागे बसलेली आहे. अचानक ती त्याला चप्पलने मारू लागते. प्रथम, ती त्याच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला मारते, नंतर डावीकडे वळते आणि रस्त्याच्या कडेला काहीतरी दाखवते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पती काहीच प्रतिक्रिया देत नाही. तो काहीही न बोलता फक्त गाडी चालवत राहतो. पती मात्र त्याच्या डोक्यात आणि तोंडावर चप्पलने मारतच राहते.

व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर

हा व्हिडिओ 'घर के कलेश' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. ही घटना भररस्त्यात सुरू असते. २१ सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. त्यांच्यातील भांडणाचे नेमके कारण उघड झालेले नसले तरी, व्हिडिओमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये जोरदार वादविवाद सुरू आहेत.

Lucknow viral video, wife hits husband on bike
Mumbai Local Train: अंबरनाथ ट्रेनमध्ये दिव्यांगांच्या डब्यात महिलेला मारहाण, Video Viral

काही विवाह भयानक असतात...

अनेकांनी या व्हिडिओला प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने 'काही विवाह भयानक असतात' असे म्हटले आहे. हा घरगुती हिंसाचार नाही का? असही एकजण म्हणतो. 'जर तुमच्या पत्नीला फसवत असाल, तर पकडले जाऊ नका,' असेही एका व्यक्तीने विनोदी पद्धतीने लिहिले. सुरक्षेची चिंता व्यक्त करत एका वापरकर्त्याने पोस्ट केली की, "शारीरिक शोषणाव्यतिरिक्त, ही महिला त्यांचे आणि रस्त्यावरील इतरांचे जीवन धोक्यात घालत आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे. मला आशा आहे की त्या गरीब मुलाला लवकरच तिच्यापासून मुक्तता मिळेल." तर, आणखी एका वापरकर्त्याने 'लग्न न करण्याचे आणखी एक कारण,' असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news