Nilesh Ghaywal Case: कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनमध्ये असल्याचा संशय; तपासाला नवे वळण

भावाच्या अटकेनंतर मोबाईल ट्रेसिंगमधून माहिती समोर; पोलिसांकडून शोध मोहीम तीव्र
Nilesh Ghaywal
Nilesh GhaywalPudhari
Published on
Updated on

पुणे: नीलेशचा भाऊ सचिन घायवळ याच्या अटकेनंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो लंडनमध्येच असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सचिन घायवळला मोबाईल पुरविणाऱ्या मुंबईतील एका सराईताचा सहभाग उघड झाला असून, त्यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

Nilesh Ghaywal
Pimpri SRA Scam: पिंपरीतील एसआरए योजनेवर प्रश्नचिन्ह; चाळ नसतानाही मंजुरीचा आरोप

कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस तसेच रेड कॉर्नर आणि त्यानंतर ब्लू कॉर्नर नोटीस बजावली असतानाच आता नीलेश घायवळ लंडनमध्येच असल्याची माहिती समोर आली आहे. गोवंडी- देवनार (मुंबई) परिसरातील रेकॉर्डवरील आरोपी सुमित कांबळे याने सचिन घायवळला दोन आयफोन व फेस आयडी काढून दिला. त्या माध्यमातून सचिन घायवळ याने भाऊ नीलेश घायवळ याच्याशी दोन वेळा संपर्क साधला.

Nilesh Ghaywal
Pune Railway Projects: रेल्वेमंत्री साहेब तुमचं स्वागत; पुणे रेल्वे प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची प्रवाशांची मागणी

दरम्यान, कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात दाखल झालेला पहिला गुन्हा आणि त्यानंतर तब्बल दहाहून अधिक गुन्हे कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्याविरोधात दाखल झाले. परंतु, पोलिस नीलेशचा शोध घेत असताना नीलेश मुलाला सोडण्यास लंडनमध्ये गेल्याचे तपासात समोर आले होते. एका प्रकरणात न्यायालयाने पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्यास आदेश असताना त्याने नावात बदल करून तो लंडन येथे गेल्याचे तपासातून समोर आले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केल्यानंतर अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्ट दिल्याचे समोर आले. तर त्याने नावात बदल करून पासपोर्ट घेतल्याचे सिद्ध झाले.

Nilesh Ghaywal
Pune CWPRS Tetrapod Design: पुण्यातील शास्त्रज्ञांनी विकसित केले किनारपट्टी संरक्षणाचे आधुनिक तंत्रज्ञान

नीलेश घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला 'लूक आउट' नोटीस बजाविली होती. त्यानंतर 'रेड कॉर्नर' नोटीस बजाविली. तर यानंतर 'ब्लू कॉर्नर' नोटीसही बजावली आहे. तरीही तो पुणे पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याचा व्हिसा संपल्यानंतर तो मायदेशी येईल, असा अंदाज पोलिसांना होता. त्‍यानंतरही पोलिसांच्या हाती आलेला नाही. त्यामुळे नीलेश घायवळ नेमका कुठे आहे, असा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी आठ महिन्यांपासून फरार असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील नीलेशचा भाऊ सचिन घायवळ याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याच्याकडे दोन आयफोन व एक साधा फोन मिळाला. तपासात नीलेश याच्याशी सचिन याने फेस आयडीवरून दोन वेळा संपर्क साधल्याचे समोर आले.

Nilesh Ghaywal
Pune Airport Passenger Growth: पुणे विमानतळावर प्रवासी संख्येत विक्रमी वाढ

दिवसा जागरण, रात्री मचाणावर झोपायचा

सचिन घायवळला पोलिस आपल्याला पकडणार हे माहिती होते. त्यामुळे तो चांगलीच खबरदारी घेत होता. प्रत्येकवेळी तो वास्तव्याचा ठिकाणा बदलत होता. दरम्यान, तो जामखेड, धाराशिव, सोलापूर परिसरात फिरला आहे. सचिन दिवसभर जागरण करायचा, तर रात्री शेतातील मचाणावर झोपायचा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news