Pune CWPRS Tetrapod Design: पुण्यातील शास्त्रज्ञांनी विकसित केले किनारपट्टी संरक्षणाचे आधुनिक तंत्रज्ञान

टेट्रापॉडसह विविध कृत्रिम दगडांच्या संकल्पनेमुळे समुद्राच्या उंच लाटा रोखण्यात मोठे यश
Pune CWPRS Tetrapod Design
Pune CWPRS Tetrapod DesignPudhari
Published on
Updated on

पुणे: समुद्राच्या उंचच उंच लाटा रोखण्यासाठी सागरी किनाऱ्यांवर कृत्रिम दगडांची भर टाकली जाते. या कृत्रिम दगडांचे आरेखन आणि संकल्पना ही पुण्यातील खडकवासला भागातील सीडब्ल्यूपीआरएस (केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र)च्या शास्त्रज्ञांची आहे. १९७० च्या दशकात मुंबईतील सर्वच ठिकाणच्या समुद्रकिनारी 'टेट्रापॉड' नावाचे सिमेंटचे कृत्रिम महाकाय दगड टाकले होते. ते आजही सुस्थितीत आहेत. यात आता नव्या तंत्रज्ञाने तयार केलेल्या दगडांची भर पडली आहे.

Pune CWPRS Tetrapod Design
Pune Airport Passenger Growth: पुणे विमानतळावर प्रवासी संख्येत विक्रमी वाढ

मुंबईत वरळी, मरीन ड्राईव्ह किंवा ताज हॉटेलसमोरच्या समुद्रकिनाऱ्यावरील भिंतीच्या आतल्या बाजूला पाण्यात त्रिशूळाच्या आकाराचे महाकाय दगड दिसतात. ज्यांचे वजन टनांमध्ये असते. याला टेट्रापॉड असे शास्त्रीय नाव असून, त्याची संकल्पना आणि आरेखन पुण्यातील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांचे आहे. खडकवासला भागातील या संस्थेचा ११० वा वर्धापन दिन रविवारी १४ जून रोजी संपन्न झाला. त्यानिमित्ताने संस्थेचा मोठा परिसर सामान्य नागरिकांसाठी खुला होता. यात धरणे, जलाशय, बंदरे याचे डिझाईन बघायला मिळाले. प्रचंड मोठा विस्तार असलेल्या या संस्थेतील नवोन्मेषांची माहिती देणारे प्रदर्शन येथे भरलेले होते. शालेय विद्यार्थांसह पालकांनी ते पाहण्याचा आनंद लुटला.

Pune CWPRS Tetrapod Design
Pune Karnataka Hapus Mango Price: कर्नाटक हापूस आंब्याचे दर तेजीत; पुणे बाजारात भाव वाढले

...या दगडांनी लक्ष वेधले

या ठिकाणी शेकडो स्टॉलवर विज्ञान प्रदर्शनाद्वारे जलविज्ञानाची माहिती दिली जात होती. तेथेच या समुद्राच्या उंच लाटा रोखणाऱ्या दगडांचेही नमुने छोट्या रूपात ठेलेले होते. शास्त्रज्ञांनी सांगितेले की, हे समुद्रकिनारी दिसणारे दगड कृत्रिम स्वरूपाचे असून, ते लाटा रोखण्याचे काम करतात.

दगडांचे प्रकार आणि महत्त्व

  • मुंबईतील किनारपट्टी भागातील उंच लाटा रोखण्यासाठी १९७० च्या दशकात प्रथम टेट्रापॉड नावाच्या दगडांची निर्मिती करण्यात आली तो प्रयोग यशस्वी ठरला.

  • याला कृत्रिम आर्मर युनिट म्हणतात. समुद्रातील मोठ्या लाटा, वादळी भरती, किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी, बॅकवॉटर नियंत्रणासाठी पाण्यात टाकले जातात.

  • पुण्यातील सीडब्ल्यूपीआरएसच्या शास्त्रज्ञांनी याचे संशोधन केले असून, त्यात आता अनेक प्रकारे नवोन्मेष केले आहेत.

Pune CWPRS Tetrapod Design
Bhimashankar Temple Online Booking: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी ऑनलाइन पास अनिवार्य; दररोज 1000 भाविकांना प्रवेश

कृत्रिम दगडांचे प्रकार

  • टेट्रापॉड : त्रिशुळासारखे सिमेंटचे महाकाय दगड. भारतीय किनारपट्टीवर सर्वाधिक वापर

  • डोलोस : जास्त इंटर लॉकिंगसाठी वापर

  • क्युब : साधा घनाकार ब्लॉक

  • ॲक्रोपॉड : एकाच थरात बसवतो. सिमेंटची बचत होते.

  • कोअर लॉक : उच्च स्थैर्याचा आधुनिक प्रकार

  • एक्सब्लॉक : नवीन तंत्रज्ञानाने केलेला प्रकार

  • एक्सब्लॉक प्लस : अद्ययावत प्रकार

Pune CWPRS Tetrapod Design
ICSI Amnesty Scheme: ICSI अभय योजना सुरू; कंपनी सचिव अभ्यासक्रम पूर्ण करण्याची पुन्हा संधी

टेट्रापॉडची वैशिष्टे

  • चार पायांच्या रचनेमुळे एकमेकांत घट्ट अडकतात.

  • लाटांची ऊर्जा मोडून काढत त्यांना परावर्तीत करतात.

  • सामान्य दगडांच्या तुलनेत कमी वजनात अधिक स्थिरता देतात.

  • मुंबईतील मरीन ड्राईव्हसह सर्वंच चौपाट्यांजवळच्या समुद्र किनाऱ्यांवर याचा वापर झाला आणि जगभरात होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news