पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या ताफ्यात आगामी काळात 900 इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. यातील 600 बस केंद्र शासनाकडून ग्रोस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) या तत्वावर घेण्यात येणार असून, 300 बस स्व: मालकीच्या छोट्या 7 मीटर लांबीच्या बस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पीएमपी कर्मचाऱ्यांचे आणि अन्य विषयांसंदर्भात पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया उपस्थित होते. पाटील यांनी यावेळी विविध विषयांसंदर्भात माहिती दिली.
हेही वाचा