Pune NEET Student: NEET निकालानंतर पुण्यात विद्यार्थिनीने संपविले जीवन; कारण अद्याप अस्पष्ट

हडपसरमधील धक्कादायक घटना; गळफास घेतल्याचे आईच्या निदर्शनास, सुसाइड नोट न सापडल्याने पोलिसांचा तपास सुरू
Death
DeathPudhari
Published on
Updated on

पुणे: नीट परिक्षेच्या निकालानंतर एका विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनुष्का चौगुले (वय. १८, रा. सॅप्रॉन हिल सोसायटी महंमदवाडी, हडपसर) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १७) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

Death
Sharad Pawar: सोनम वांगचुक यांच्या अटकेवर शरद पवारांचा केंद्रावर हल्लाबोल; 'अटकेने आंदोलन दडपता येणार नाही'

याप्रकरणी, काळेपडळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले, अनुष्का हीने नीटची परिक्षा दिली होती. त्या परिक्षेचा निकाल काल लागला होता.

Death
Pune Musical Shows: अभंगांचा गाभा समजण्यासाठी आयुष्यभर अभ्यास आवश्यक; निरूपणकार रवींद्र खरे यांचे मत

वडील खासगी नोकरी करतात तर आई गृहीणी आहे. अनुष्काला एक लहान भाऊ आहे. सकाळी वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. तर भाऊ शाळेत गेला होता. आई आणि ती असे दोघे घरी होते. काल नीटच्या निकालाचे संकेतस्थळ डाऊन होते. त्यामुळे तिने आज सकाळी निकाल पाहिला असावा.

Death
Khadakwasla Dam Water Discharge: खडकवासला धरणातून मुठा कालव्यात पाण्याचा विसर्ग वाढला; पुणेकरांच्या पाण्यावर परिणाम होणार का?

अनुष्का त्यानंतर तिच्या खोलीत गेली होती. उशिरापर्यंत आवाज देऊन देखील ती दरवाजा उघडत नाही हे लक्षात आल्यानंतर तिच्या आईने दुसऱ्या चावीच्या साह्याने खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी अनुष्का हिने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.

Death
Pune Food Testing Machine Missing: ११.९८ लाखांची फूड टेस्टिंग मशीन गायब; पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा धक्कादायक कारभार

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी खोलीत पाहिले असता, सुसाईड नोट मिळून आली नाही. तसेच ती मोबाईल वापरत नव्हती. त्यामुळे अनुष्का हिने आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे मात्र समजू शकलेले नाही. पुढील तपास काळेपडळ पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news