पुण्यात खड्डे आणि पावसाळी कामांसाठी विशेष पथके नेमा’: ‘राष्ट्रवादी (अजित पवार गट); निवेदनद्वारे महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुण्यात खड्डे आणि पावसाळी कामांसाठी विशेष पथके नेमा’: ‘राष्ट्रवादी (अजित पवार गट); निवेदनद्वारे महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी आणि त्यावर तातडीने डागडुजी करण्यासाठी आपण विशेष पथक अर्थात 'टास्क फोर्स' नेमून नियंत्रण ठेवावे. तसेच शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून याचा फटका नागरिकांना आणि छोट्या व्यावसायिकांना फटका बसतो. या पार्श्वभूमीवर पाणी साचणारे भाग निश्चित करुन त्या भागात तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

पावसाळ्याच्या अनुषंगाने मागण्यांचे निवेदन आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन मानकर यांनी दिले. खड्डे तातडीने बुजवण्याठी विशेष पथके नेमण्याबरोबरच यासाठी 'टोल फ्री क्रमांक' सुरु करुन यास व्हॉट्स अपद्वारे जोडल्यास नागरिकांना आपल्याशी संपर्क साधणे सहज शक्य होईल. 'कमी वेळात अधिक पाऊस झाल्यास शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून याचा फटका नागरिकांना आणि छोट्या व्यावसायिकांना फटका बसतो. या पार्श्वभूमीवर पाणी साचणारे भाग निश्चित करुन त्या भागात तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी मानकर यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मानकर म्हणाले, पुणेकरांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सज्ज असून प्रश्नांचा पाठपुरावा करणे आणि ते सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पावसाळा कामतांसंदर्भात केलेल्या मागण्यांचा आयुक्त सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही करतील, हा विश्वास आहे'.

शिवसृष्टी आणि भिडेवाडा स्मारकांच्या कामाला गती द्यावी : मानकर

पुणे महापालिकेच्या माध्यमातून भव्य-दिव्य शिवसृष्टी साकारण्यासंदर्भातचा निर्णय झाला असला तरी याबाबत कोणतीही प्रगती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसृष्टीच्या कामाला गती द्यावी आणि भिडेवाडा येथे साकारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला गती द्यावी, या मागण्याही मानकर यांनी आयुक्तांकडे केल्या आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news