Narhe Dhayari Drainage Issue: नऱ्हे-धायरी फाटा रस्त्यावर मैलापाण्यामुळे नागरिकांची आरोग्यहानी

सतत वाहणाऱ्या मैलापाण्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि रोगांचा धोका; नागरिक त्वरित उपाययोजना मागत आहेत
Narhe Dhayari Drainage Issue
Narhe Dhayari Drainage IssuePudhari
Published on
Updated on

धायरी: सिंहगड रोड परिसरातील नऱ्हेमध्ये नऱ्हे- धायरी फाटा रस्त्यावर (प्रभाग क्र. 34) मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र व नवले हॉस्पिटल गेट परिसरात सतत रस्त्यावर वाहणाऱ्या मैलापाण्यामुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. सतत रस्त्यावरून वाहणाऱ्या या मैलापाण्यामुळे येथून जाता-येताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. येथे दवाखाने, औद्योगिक वसाहत, शैक्षणिक संस्था असल्यामुळे सतत या रस्त्यावर नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.

Narhe Dhayari Drainage Issue
Ex-Police Havaldar Arrest Fraud: पुण्यात आर्थिक फसवणुकीसाठी फरार माजी पोलीस हवालदाराची अटक

येथून वाहने जाताना हे मैलापाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. अनेक लहान मुले या रस्त्यावर खेळत असतात. दुर्गंधी व मैलापाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, हिवताप इत्यादी साथीच्या आजारांची लागण होत आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर येणारे मैलापाणी त्वरित बंद करा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

Narhe Dhayari Drainage Issue
IITM Pune Italy AI Weather: आयआयटीएम पुणे-इटली करार: एआयच्या साहाय्याने हवामान अंदाज अधिक अचूक

वाहिन्या न जोडल्याने मैलापाणी रस्त्यावर

या परिसरात महापालिकेच्या वतीने मुख्य खात्याकडून मोठ्या व्यासाच्या मैलापाणी वाहिनी टाकण्यात आल्या आहेत. परंतु, डोंगर उतारावर असणाऱ्या सोसायट्यांच्या अंतर्गत कमी व्यासाच्या मैलापाणी वाहिन्या या मोठ्या व्यासाच्या वाहिन्यांना जोडल्या नसल्याने ड्रेनेज तुंबून हे मैलापाणी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहत आहे. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते.अनेक आंदोलने केल्यामुळे या परिसरातील नागरिकांची मैलापाण्याच्या त्रासातून कायमची सुटका व्हावी, म्हणून महापालिका मुख्य खात्याकडून मोठ्या व्यासाच्या मैलापाणी वहिनी टाकण्यात आल्या आहेत. या मोठ्या व्यासाच्या वाहिन्यांना सोसायट्यांच्या कमी व्यासाच्या वाहिन्या त्वरित जोडण्यात येऊन या मैलापाण्याच्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्यात यावी. अन्यथा, तीव आंदोलन करण्यात येईल.

Narhe Dhayari Drainage Issue
Pune Dhanraj Jadhav Arrest: पुण्यात मसाज स्पा रॅकेटचा प्रमुख धनराज जाधव अटक, नागपूर कारागृहात स्थानबद्ध

या परिसरातील डोंगर-उतारावर असणाऱ्या सोसायट्यांचा सर्व्हे करून त्यांना नोटिसा देऊन या सोसायट्यांच्या कमी व्यासाच्या मैलापाणी वाहिन्या मुख्य मोठ्या व्यासाच्या वाहिन्यांना जोडण्याची कार्यवाही त्वरित सुरू करण्यात येईल.

विजय वाघमोडे, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

Narhe Dhayari Drainage Issue
Pune Ajit Pawar Tribute: पुण्यात महापालिकेत दिवंगत अजित पवार व सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली

अनेक आंदोलने केल्यामुळे या परिसरातील नागरिकांची मैलापाण्याच्या त्रासातून कायमची सुटका व्हावी, म्हणून महापालिका मुख्य खात्याकडून मोठ्या व्यासाच्या मैलापाणी वहिनी टाकण्यात आल्या आहेत. या मोठ्या व्यासाच्या वाहिन्यांना सोसायट्यांच्या कमी व्यासाच्या वाहिन्या त्वरित जोडण्यात येऊन या मैलापाण्याच्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्यात यावी. अन्यथा, तीव आंदोलन करण्यात येईल.

भूपेंद्र मोरे, सामाजिक कार्यकर्ता, नऱ्हे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news