Ex-Police Havaldar Arrest Fraud: पुण्यात आर्थिक फसवणुकीसाठी फरार माजी पोलीस हवालदाराची अटक

चार-पाच महिन्यांपासून फरार असलेल्या गणेश अशोक जगताप याला आंध प्रदेशातून ताब्यात घेऊन भारती विद्यापीठ पोलिसांनी न्यायालयात हजर केले
police
PolicePudhari
Published on
Updated on

पुणे: आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर मागील चार-पाच महिन्यांपासून फरार झालेल्या निलंबित पोलिस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध प्रदेशातून अटक केली. गणेश अशोक जगताप (52, रा. कावेरीनगर पोलिस वसाहत, वाकड, पुणे) असे त्याचे नाव आहे. जगताप याच्यावर भारती विद्यापीठ, चतुःशृंगी आणि कोथरूड पोलिस ठाण्यात आर्थकि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. रविवारी (दि. 8) दुपारी त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 11 फेबुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

police
IITM Pune Italy AI Weather: आयआयटीएम पुणे-इटली करार: एआयच्या साहाय्याने हवामान अंदाज अधिक अचूक

पार्लर व्यावसायिक महिलेची अडीच लाखांहून अधिक रोकड, सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली होती. घरच्यांच्या आजारपणाचा बहाणा करून, तसेच मुलीच्या शिक्षणाचे कारण सांगून त्याने ही फसवणूक केली होती. याप्रकरणी, भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार जगताप याच्यावर गुन्हा दाखल केला होता, तर यापूर्वी देखील जगताप याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात एका महिलेचे 73 तोळे सोने आणि 17 लाख रुपये रोख घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा जुलै महिण्यात दाखल झाला होता. दरम्यान, 21 ऑगस्ट 2024 मध्ये जगताप याची पोलिस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. मात्र, हजर न राहता त्याने यादरम्यान आणखी एका सराफाला गंडा घातला. पुण्यातील औंध भागात असलेल्या एका सराफी व्यावसायिकडून जगताप याने पोलिस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून 8 लाख 22 हजार रुपयांचे दागिने खरेदी केले होते.

police
Pune Dhanraj Jadhav Arrest: पुण्यात मसाज स्पा रॅकेटचा प्रमुख धनराज जाधव अटक, नागपूर कारागृहात स्थानबद्ध

या घटनेमुळे विशेष शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप यांचे निलंबन केले होते. दरम्यानच्या कालावधीत जगताप शहरातून फरार झाला होता. त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल असलेले पोलिस ठाण्याची पथके मागावर होती. दोन दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलिसांना जगताप आंध प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील फुलपथरू गावात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलिस अंमलदार मंगेश गायकवाड यांच्या पथकाने रविवारी (दि. 8) दुपारी जगताप याला ताब्यात घेतले. जगताप हा एका भाड्याच्या सदनिकेत तेथे वास्तव्यास होता. तो फुलपथरू गावातील एका मंदिरात अधूनमधून दर्शनाला येत होता. पोलिसांनी गावात पोहोचल्यानंतर त्या मंदिरातील पुजाऱ्याला जगताप याचा फोटा दाखविला. त्यावेळी तो राहात असलेली सदनिकाला पोलिसांना सापडली. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

police
Pune Ajit Pawar Tribute: पुण्यात महापालिकेत दिवंगत अजित पवार व सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली

यापूर्वी देखील पोलिसांनी जगताप याला अटक केली होती. राष्ट्रपतीपदक मिळविण्यासाठी त्याने खोटी कागदपत्रे सादर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 2021 मध्ये सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस दलातील गणेश जगतापसह दोन लिपिकांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता आर्थकि फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.

police
Pudhari 'RiseUp' Women Kabaddi Tournament: पुण्यात ‘राईज अप’ महिला कबड्डी स्पर्धेत डॉ. पतंगराव कदम संघाची दुहेरी बाजी

गणेश जगताप याच्यावर आर्थिक फसवणुकीचा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो चार-पाच महिन्यांपासून फरार झाला होता. त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला आंध प्रदेशातून अटक केली आहे.

मिलिंद मोहिते, पोलिस उपायुक्त, पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news