Pune Ajit Pawar Tribute: पुण्यात महापालिकेत दिवंगत अजित पवार व सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली

सर्वपक्षीय नगरसेवकांनी पुण्याच्या विकासातील योगदान व आठवणी उजाळा देत भावनिक कार्यक्रम
Ajit Pawar Tribute
Ajit Pawar TributePudhari
Published on
Updated on

पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे शहराच्या विकासासाठी केलेल्या कामांचा गौरव करीत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देत महापालिकेच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी अनेक नवनिर्वाचित नगरसेवकांनी पहिल्याच सभेत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आल्याची भावना व्यक्त केली.

Ajit Pawar Tribute
Pudhari 'RiseUp' Women Kabaddi Tournament: पुण्यात ‘राईज अप’ महिला कबड्डी स्पर्धेत डॉ. पतंगराव कदम संघाची दुहेरी बाजी

महापौर व उपमहापौरनिवडीनंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार सुरेश कलमाडी, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांना श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब करण्यात आली. या वेळी भाजपचे गटनेते गणेश बिडकर म्हणाले, ‌‘दादा म्हणजे काम, वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा आणि मोठ्या मनाचा दिलदार नेता‌’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. त्यांच्या जाण्याने पुण्याने केवळ एक राजकीय नेता नाही, तर शहराचा विकास ‌‘हातात धरून‌’ पुढे नेणारे प्रशासकीय नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीला पुढे नेणे, प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणे आणि शहरहितासाठी पक्षभेद विसरून एकत्र काम करणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना व्यक्त केली. कलमाडी यांनी पुण्याची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Ajit Pawar Tribute
Delhi Blast Pune Connection: दिल्ली स्फोटाच्या ‘पुणे कनेक्शन’चा उलगडा; खोट्या कॉलमागचे सत्य उघड

राष्ट्रवादीचे गटनेते नीलेश निकम यांनी अजित दादांच्या आठवणींना उजाळा देत काम होणार असेल, तर ते करण्यासाठी प्रयत्न करा, होणार नसेल तर खेटे मारून पैसे खर्च करू नका, हा अजित पवार यांचा मंत्र त्यांनी या वेळी सांगितला. अजित पवार म्हणजे राजकारणातील हुकमी एक्का, असे सांगत काँग््रेासचे गटनेते अरविंद शिंदे यांनी काम झाले नाही, तर अजितदादांच्या दारी जायचे. पक्ष, जात न पाहता काम होत असेल, तर ते लगेच करून टाकत, असे सांगितले. तर, कलमाडी आमचे नेते होते, त्यांनी शहराच्या विकासासाठी मोठे काम केले. स्थायी समिती अध्यक्षपद होण्याचा मान त्यांनी दिला. नगरसेवक प्रशांत जगताप यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी, ‌‘व्यक्ती हयात असताना तिचे महत्त्व कळत नाही; निधनानंतर त्या व्यक्तीबद्दलच्या भावना कळतात,‌’ असे सांगत अजित पवार हे निर्णय घेण्यात मागे-पुढे न पाहणारे नेतृत्व असल्याचे नमूद केले.

Ajit Pawar Tribute
Pune Minor Delivery Case: पुण्यात धक्कादायक प्रकार; १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची घरात एकटीने प्रसूती

काँग््रेासचे गटनेते चंदू कदम म्हणाले, प्रशासनावर वचक असलेल्या नेत्याच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना (उबाठा)चे नितीन गावडे यांनी अजित पवार यांना शब्दाचा पक्का, प्रशासनावर पकड असलेला, सर्वांना हवाहवासा नेता असे म्हटले, तर शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम अशी उपमा देत त्यांच्या जाण्याने राजकीय-सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे नमूद केले. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी अजित पवार यांना प्रशासनावर पकड असलेला, तंतोतंत माहिती असलेला आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारा दुर्मीळ नेता, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. नगरसेविका वैशाली बनकर ह्या श्रद्धांजली अर्पण करताना भावुक झाल्या. सर्वसामान्य घरातील महिलेला महापौरपदाची संधी देणारे अजितदादा होते, असे त्यांनी सांगितले. नगरसेवक दत्ता बहिरट यांनी गोखलेनगर येथील विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला अजित पवारांचे नाव देण्याची मागणी केली.

Ajit Pawar Tribute
Pune Deputy Mayor Parshuram Wadekar: पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर; चळवळीतील कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंतचा प्रवास

या वेळी नगरसेवक काका चव्हाण, निवृत्ती बांदल, सुहास टिंगरे, नंदिनी धेंडे, निवेदिता एकबोटे, अजित घुले, सुरज लोखंडे, गौरव घुले, हर्षवर्धन मानकर, स्वप्निल दुधाणे, स्मिता कोंढरे, हेमलता मगर, प्रिया गदादे, रेखा टिंगरे, सिद्धी शिळीमकर, अविनाश साळवे, सायली वांजळे, सुरेश भोईर, प्रसन्न जगताप, पुनीत जोशी, गणेश कल्याणकर, संदीप बेलदरे, अजय खेडेकर, अनिता इंगळे, रवी टिंगरे यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.

अनेक संकटे आली. मात्र, या संकटावर मात करणारा माणूस म्हणजे अजित पवार हे होते. मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे. मात्र, अजित पवार हे आपल्यातून निघून गेले, आजही मन मानायला तयार होत नाही. प्रशासनावर प्रचंड पकड असणारा माणूस म्हणजे अजित पवार यांचे नाव आहे. त्यांच्या प्रशासनावर असलेल्या पकडीमुळेच पुण्यातील, राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत.

परशुराम वाडेकर, उपमहापौर

आपल्यातील क्षमतेनुसार काम करून अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करणार. त्यांच्यासमेवत 2012 साली जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी मिळाली. जवळपास 5 वर्षे कामे केले. पुणे शहराचा विकास करताना नेहमी अजित पवार यांच्या कामाचा झपाटा लक्षात ठेवून काम करणार आहे. आपल्यातील क्षमतेला ज्येष्ठ नेत्यांनी काम करून शिदोरी तयार केली, त्यावर राजकीय आयुष्य जगत असतो. असे नेते कायम स्मरणात ठेवून काम केले पाहिजे. पुणे शहराच्या जनतेच्या विकासासाठी चांगले निर्णय घ्यावे लागतील.

मंजूषा नागपुरे, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news