

पुणे : वडिलांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
संजिवनी जीवन रोडे (वय 17, रा. जिजाबाईनगर, नांदेडगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत मुलीची आई शीला जीवन रोडे (वय 50, रा. जिजाबाईनगर, नांदेडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जीवन गणपती रोडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोडे कुटुंबीय गेल्या दहा वर्षांपासून जिजाबाईनगर येथे राहण्यास आहेत. आरोपी जीवन हा तक्रारदार शीला यांचा पती आहे.
त्यांना सहा मुले आहेत. तीन मुलींची लग्नं झाली असून संजिवनी, तिची मोठी बहीण आणि तिचा अकरा वर्षांचा लहान भाऊ हे त्या ठिकाणी राहण्यास होते. शीला या घरकाम करून कटुंबाचा उदरनिर्वाह चालत होते. पती जीवन याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन माझ्यासोबत भांडण व शिवीगाळ करत होता.
तसेच, मुलांना देखील शिवीगाळ करत होते. दि. 29 सप्टेंबर रोजी शीला या घरकाम करण्यासाठी सकाळी 8 वाजता घराबाहेर पडल्या होता. या वेळी पती, दोन मुली आणि मुलगा घरीच होता. त्यानंतर त्यांची मोठी मुलगी दुपारी तीन वाजता कामावर गेली. दि. 29 सप्टेंबर रोजी शीला या कामावर असताना दुपारी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आला.
या वेळी त्यांनी पत्नीला संजिवनी हिने फाशी घेतल्याचे सांगितले. या वेळी मुलीने मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये वडिलांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत म्हटले होते. पुढील तपास नांदेडसिटी पोलिस करत आहेत.