

पुणे : भरधाव रिक्षा उलटून रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना पर्वती परिसरात घडली. लखन रामू अवघडे (वय २५, रा. भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
याबाबत पाेलिस हवालदार विवेक आदक यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक लखन अवघडे ४ डिसेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास पर्वती गाव परिसरातून भरधाव वेगाने निघाला होता.
श्रद्धा ऑप्टीकल दुकानासमोर भरधाव रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. अपघातात रिक्षाचालक अवघडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
गंभीर जखमी झालेल्या अवघडेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक कोपनर तपास करत आहेत.