Maratha Reservation : पुण्यात मुस्लिम समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

Maratha Reservation : पुण्यात मुस्लिम समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा
Published on
Updated on

पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी मुस्लिम समाजाने पुण्यातील कोंढवा येथील नरवीर तानाजी मालुसरे चौक येथे निदर्शने केली. मुस्लिम समाजातील तरूणांनी मनोज जरांगे पाटील यांना समाजाच्या वतीने जाहिर पाठिंबा देत लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

मुस्लिम फाउंडेशन यांच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाचे नेतृत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा ॲड. हाजी अ. गफुर पठाण यांनी केले होते .यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आल्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news