कांद्याचे दर कडाडले ! प्रति १० किलोस मिळाला इतका दर

Onion www
Onion www
Published on
Updated on

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढू लागले आहेत. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारातही कांद्याला चांगले दर मिळत असून, रविवारी (दि. 29) झालेल्या लिलावात एक नंबर सुपर गोळे कांद्यास प्रति 10 किलो 625 रुपये, असा कमाल दर मिळाल्याची माहिती सभापती संजय काळे व संचालक प्रीतम काळे यांनी दिली. शेतकर्‍यांमध्ये कांद्याच्या दराबाबत सध्या काही खुषी तर काही दुखी अशी स्थिती आहे. ज्या शेतकर्‍यांकडे सध्या कांदा आहे, त्यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, बहुतेक शेतकर्‍यांकडे विक्रीस कांदाच उपलब्ध नसल्याने त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या :

कांद्याच्या चांगल्या अवस्थेसाठी प्रसिद्ध असलेल्या आळेफाटा उपबाजारात मंगळवार, शुक्रवार व रविवार असे आठवड्यातले तीन दिवस कांद्याचे लिलाव होतात. या उपबाजारात जुन्नर तालुक्यातील तसेच शेजारील शिरूर, पारनेर, संगमनेर आणि अकोले येथील कांदा विक्रीस येत असतो. कांद्याचे निर्यात मूल्य वाढविल्यानंतर आळेफाटा उपबाजारातही कांद्याचे दर स्थिर झाले होते. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून कांदादरात वाढ होण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी (दि. 27) झालेल्या लिलावात कांद्याला उच्चांकी प्रति
10 किलो असा 700 रुपये बाजार भाव मिळाला.

आळेफाटा उपबाजारात ऑक्टोबर महिन्यातही कांद्याची चांगली आवक झाली. रविवारी 21 हजार 300 कांदा गोणी शेतकरीवर्गाने लिलावात विक्रीस आणल्याची माहिती बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे व कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी दिली.

कांद्यास मिळालेला दर (प्रतिदहा किलो)
कांदा रुपये
गोळे 601 ते 625
सुपर गोळे 580 ते 601
सुपर मीडियम 450 ते 560
गोल्टी 300 ते 350
बदला 100 ते 250
सिंगल पत्ती 325 ते 400

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news