पुणे : पुराच्या नियंत्रणासाठी पालिकेचा आराखडा तयार

पुणे : पुराच्या नियंत्रणासाठी पालिकेचा आराखडा तयार
Published on
Updated on
पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने पूर व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, त्याचे सादरीकरण नुकतेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला करण्यात आले आहे. यासाठी केंद्र शासनाच्या अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट (शहरी पूर जोखीम व्यवस्थापन) अंतर्गत 250 कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी महापालिकेने केंद्राकडे केल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
देशातील प्रमुख शहरांमध्ये पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यात, पुणे शहराचाही समावेश आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून मोठ्या शहरांसाठी अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेंतर्गत 2021-2026 या कालावधीसाठी शहरांना विशेष निधी दिला जाणार आहे.
हा निधी 14 व्या व 15 व्या वित्त आयोगांर्तगत दिला जाणार आहे. तर महापालिकेस या कामासाठी या वर्षात 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेस केंद्र शासनास पूर व्यवस्थापन आराखडा सादर करायचा आहे.  दरम्यान, पुणे पालिकेने हा आराखडा तयार केलेला असून, त्यासाठी सी-डॅकची मदत घेण्यात आली आहे. सादरीकरण नुकतेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला करण्यात आले आहे. यामध्ये प्राधिकरणाने काही सूचना केल्यास त्याचा अंतर्भाव अंतिम आराखड्यात करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

आराखड्यात नेमके काय?

टेकड्यांवर चर खणणार
पूर येणार्‍या नाल्यांवर कल्व्हर्ट
नाल्याचे ड्रोनद्वारे मॅपिंग
तातडीच्या पावसाळी जलवाहिन्या
कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर उभारणार
नाल्यांवर गॅबियन वॉल उभारणे
शहरात पर्जन्यमापकांची संख्या वाढविणे
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news