MPSC Students Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ८० वर्षीय मालन आजींचा पाठिंबा; चारधाम यात्रा सोडून पुण्यात दाखल

दिल्लीतील जंतरमंतरवरही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी १८ दिवस केले होते आंदोलन; एस. एम. जोशी पुलावरील सत्याग्रहात सहभाग
MPSC Students Protest Malan Fase
MPSC Students Protest Malan FasePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या एस.एम जोशी पूल येथील सत्याग्रह आंदोलनाला विटा (ता. खानापूर, जि. सांगली) येथील ८० वर्षांच्या ध्येयवादी आजी ‘मालन फासे’ यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला.

MPSC Students Protest Malan Fase
MPSC Students Protest: एमपीएससी अध्यक्षांच्या चौकशीसाठी नियुक्ती करा; विद्यार्थ्यांची मागणी

मालन आजी या त्याच लढाऊ महिला आहेत, ज्यांनी यापूर्वी दिल्लीच्या जंतरमंतरवर युवा शक्ती आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी देशाच्या शिक्षणमंत्र्यांविरोधातील आंदोलनात तब्बल १८ दिवस रस्त्यावर ठाण मांडले होते.

MPSC Students Protest Malan Fase
Rohit Pawar MPSC Protest: एमपीएससी अध्यक्षांना वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडू नका; रोहित पवारांचा सरकारला इशारा

आध्यात्मिक यात्रा सोडून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी पुण्यात धाव

गेल्या काही दिवसांपासून मालन आजी चारधाम यात्रेसाठी निघाल्या होत्या. त्यांनी द्वारका, रामेश्वरम आणि जगन्नाथ पुरी या तीन पवित्र धामांचे दर्शन पूर्ण केले होते आणि शेवटचे धाम असलेल्या केदारनाथकडे त्या निघाल्या होत्या.

MPSC Students Protest Malan Fase
Gyanesh Kumar Resignation Protest: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

परंतु, पुण्यात विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाची आणि त्यांच्या आंदोलनाची बातमी त्यांना समजताच, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला आध्यात्मिक प्रवास मध्येच सोडून थेट द्वारकेहून पुण्यातील एसएम जोशी पूल येथील आंदोलनस्थळ गाठले.

MPSC Students Protest Malan Fase
Pune District Health Camps: त्रास नसला तरी आरोग्य तपासणी करा! पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे

विशेष योगायोग म्हणजे, आज नवरात्रोत्सवाचा म्हणजेच नारीशक्ती आणि आदिशक्तीच्या पूजेचा पहिला दिवस आहे. याच पवित्र दिवशी पुण्यात रस्त्यावर उतरून हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना ताकद देण्यासाठी ही ‘नारीशक्ती’ स्वतः चालत आली. मालन आजींच्या रूपाने या आंदोलनाला साक्षात आदिशक्तीचाच आशीर्वाद लाभला. त्यामुळे या लढ्याला यश आल्याशिवाय राहणार नाही.

रोहित पवार, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news