Gyanesh Kumar Resignation Protest: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील कलाकार कट्ट्यावर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी; वाहतूक कोंडीमुळे पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात
Gyanesh Kumar Resignation Protest
Gyanesh Kumar Resignation ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक कॅफेजवळील कलाकार कट्ट्याच्या परिसरात आंदोलन करण्यात आले. या वेळी विद्यार्थी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Gyanesh Kumar Resignation Protest
Pune District Health Camps: त्रास नसला तरी आरोग्य तपासणी करा! पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे

'तानाशाही नहीं चलेगी', 'वंदे मातरम्', 'इन्कलाब जिंदाबाद', 'ज्ञानेश कुमार राजीनामा द्या' आणि 'जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांना ताब्यात घेतले.

Gyanesh Kumar Resignation Protest
Pune Dengue Prevention: पुण्यात डेंग्यूचा धोका वाढला; ३,३४८ दूषित कंटेनर, ६०० बांधकाम व्यावसायिकांचे महापालिकेला असहकार्य

पोलिस उपआयुक्त कृषिकेश रावले म्हणाले, सोशल मीडियावरून आवाहन केल्यामुळे कलाकार कट्ट्यावर मोठ्या संख्येने लोक जमले. त्यामुळे परिसरात सुमारे ५०० मीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली.

Gyanesh Kumar Resignation Protest
Pune Dengue Cases 2026: पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; कोथरूडमध्ये सर्वाधिक २२९ रुग्ण, चार मलेरिया अधिकाऱ्यांना नोटिसा

या गर्दीमुळे सामान्य नागरिक आणि कलाकारांची गैरसोय होत होती. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही गर्दी हटत नसल्याने आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कारवाई करण्यात आली.

Gyanesh Kumar Resignation Protest
Ambergris Smuggling Bhor: भोरमध्ये ५ कोटींचे अंबरग्रीस जप्त; व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पाच जण ताब्यात

वाहतूक कोंडीत गॅस सिलिंडरची गाडी अडकल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधितांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. रस्ता अडवून नागरिकांची गैरसोय करणे योग्य नसून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणे पोलिसांचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news