Rohit Pawar MPSC Protest: एमपीएससी अध्यक्षांना वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडू नका; रोहित पवारांचा सरकारला इशारा

सायंकाळपर्यंत निर्णय घेण्याची मागणी; चौकशी समितीत तुकाराम मुंढेंचा समावेश करण्याची मागणी
Rohit Pawar
Rohit PawarPudhari file photo
Published on: 
Updated on: 

पुणे: एमपीएससीचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे खास मित्र आहेत. मित्राला वाचवण्यासाठी लाखो स्पर्धा परीक्षार्थींना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. आम्ही शुद्धीकरणाचा ड्राफ्ट सरकारला दिला आहे. हे गरीब, शेतकरी, शेतमजुरांची मुले आहेत. अहंकार दाखवाल तर उद्या पालक आणि नागरिकही रस्त्यावर उतरतील. तेव्हा फोकस फक्त अध्यक्षांवर नाही, तर सरकारवर असेल. सायंकाळपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा उद्याचे आंदोलन सरकारला परवडणारे नसेल, असा इशारा अमदार रोहित पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.

Rohit Pawar
Gyanesh Kumar Resignation Protest: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

पुणे, मुंबई आणि दिल्लीतील कारवाईचा संदर्भ देत पवार म्हणाले, महाराष्ट्र पोलिसांबद्दल आदर आहे. परंतु, पुण्यात विद्यार्थ्यांना हाताळताना चुकीची पद्धत अवलंबल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. दिल्ली पोलिसांबद्दल वेगळी प्रतिमा आहे. परंतु, महाराष्ट्र पोलिसांकडूनही तसेच होत असेल तर योग्य नाही.

Rohit Pawar
Pune District Health Camps: त्रास नसला तरी आरोग्य तपासणी करा! पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे

दिल्लीतील आंदोलनावरून त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. ४० हजार फौजफाटा दिल्लीत लावला आहे. रेल्वे, मेट्रो, पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे. आठ फुटी बॅरिकेड लावले आहेत. दिसेल त्याला उचलले जात आहे. अभिजित दिपकेला ताब्यात घेतले, त्यांच्या आजीचे निधन झाले तरी फोन करू दिला नाही, असा आरोप पवार यांनी केला.

Rohit Pawar
Pune Dengue Prevention: पुण्यात डेंग्यूचा धोका वाढला; ३,३४८ दूषित कंटेनर, ६०० बांधकाम व्यावसायिकांचे महापालिकेला असहकार्य

तसेच, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिल्लीला जाताना मध्य प्रदेशात ताब्यात घेऊन पुण्यात आणल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. आम्ही पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थिनींना घरी सोडण्याची विनंती केली. त्यांना सोडले गेले, मात्र विलंबामुळे काहींना त्रास सहन करावा लागला असल्याचे मत देखील पवार यांनी व्यक्त केले.

Rohit Pawar
Pune Dengue Cases 2026: पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; कोथरूडमध्ये सर्वाधिक २२९ रुग्ण, चार मलेरिया अधिकाऱ्यांना नोटिसा

‘समितीत तुकाराम मुंढेंचा समावेश करा’

शिष्टमंडळाच्या भेटीत न्यायालयीन चौकशीची चर्चा झाली होती. परंतु, अध्यक्ष पदावर असताना चौकशी पारदर्शक होणार नाही. त्यामुळे वॉचमनपासून अध्यक्षांपर्यंत चौकशी व्हावी आणि समितीत तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा समावेश करावा, अशी मागणी असल्याचे देखील पवार यांनी स्पष्ट केले.

आमचे राजकारण हे समाजकारण...

राजकीय आंदोलनाच्या आरोपावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी एसीत न बसता विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आमचे राजकारण समाजकारण आहे. दुष्काळग्रस्तांना मदत नसताना १२ कोटी ६८ लाखांच्या व्हीआयपी गाड्या आणि लंडनच्या खासगी कार्यक्रमासाठी १० कोटींचा खर्च होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news