MPED MED CET Registration 2026: एमपीएड व एमएड सीईटी 2026 नोंदणीला सुरुवात; 20 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज

राज्य सीईटी कक्षाकडून प्रक्रिया सुरू; अपार आयडी व यूडीआयडी बंधनकारक
CET registration 2026
CET registration 2026Pudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी एमपीएड व एमएड या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीस 5 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या दोन अभ्यासक्रमाच्या सीईटीपासून 2026 च्या सीईटी नोंदणीस प्रारंभ झाला आहे. ही नोंदणी 20 जानेवारीपर्यंत ऑनलाइन होणार आहे. इतर अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीसही लवकरच सुरुवात होणार आहे.

CET registration 2026
Pune Health Department Bribe Case: बदलीसाठी तीन लाखांची लाच! पुणे जिल्हा परिषद आरोग्यसेवक अटकेत, उपसंचालक अडचणीत

या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://mahacahet.org/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

CET registration 2026
Deccan Sugar Technology Land Scam: पुण्यात 300 कोटींचा घोटाळा? डेक्कन शुगर संस्थेच्या जागेवर राष्ट्रवादी कार्यालयावर गंभीर आरोप

ही सीईटी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन घेतली जाईल. मागील वर्षी या दोन प्रवेश परीक्षेत 6 हजार 193 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एमपीएडची सीईटी 24 मार्चला, एमपीएड फिल्ड टेस्ट 25 मार्चला एमएडची सीईटी 25 मार्चला घेण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

CET registration 2026
Maharashtra Rabi Crop Sowing: राज्यात रब्बी पेरण्या 101 टक्क्यांवर; गहू-हरभरा 100 टक्के पूर्ण

नोंदणीसाठी अपार आयडी व यूडीआयडी बंधनकारक

विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे सहज शक्य व्हावे. यासाठी सीईटी सेलने प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडेमिक अकाउंट रजिस्ट्री (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्यांना युनिक डिसॲबिलिटी आयडी (यूडीआयडी ) बंधनकारक केला आहे. विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये नोंदणी करताना अपार आयडी व यूडीआयडीची नोंदणी करावी.

CET registration 2026
Junnar Municipality Mayor: जुन्नर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी सुजाता काजळे; निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते पदभार, अनोखा आदर्श

यावरून विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही त्यांनी तो डिजीलॉकरद्वारे तयार करावा. उमेदवारांनी पुढील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news