Junnar Municipality Mayor: जुन्नर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी सुजाता काजळे; निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते पदभार, अनोखा आदर्श

शिवसैनिकांचा जल्लोष, पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराचे नगराध्यक्षा काजळेंचे आश्वासन
Junnar Municipality Mayor
Junnar Municipality MayorPudhari
Published on
Updated on

लेण्याद्री: जुन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुजाता मधुकर काजळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सोमवारी (दि. 5) पदभार स्वीकारला. या वेळी शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे, काजळे यांनी पदभार नगरपालिकेच्या निवृत्त सफाई कामगार वत्सलाबाई भागाजी डबडे यांच्या हस्ते स्वीकारून एक अनोखा आणि समाजाला प्रेरणा देणारा आदर्श घालून दिला.

Junnar Municipality Mayor
Indapur Pirsaheb Urus Kusti: पीरसाहेब उरुसाची जल्लोषात सांगता; निकाली कुस्त्यांच्या मैदानात सतपाल सोनटक्के विजयी

सकाळी 10 वाजता जुन्नर नगरपालिकेच्या प्रांगणात पदग््राहण सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी प्रथम नगरपालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिषेक करण्यात आला. तसेच गाय-वासराचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थिनींनी सामूहिकरीत्या राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन केले. 11 वाजता नगरपालिकेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांचा तसेच शहरातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार व पदग््राहण समारंभ पार पडला. याप्रसंगी शहरातील स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

Junnar Municipality Mayor
Walchandnagar Road Protest: वालचंदनगर–जंक्शन रस्त्याच्या कामावर कंपनीचा आक्षेप; नागरिकांचे ठिय्या आंदोलन

या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला. तसेच ‌‘विजयाचा चौकार‌’ मारणाऱ्या माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका अलकाताई फुलपगार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. माजी नगरसेवक मधुकर काजळे म्हणाले, ‌‘पदभार मिळाला म्हणजे काम संपले असे नाही, तर आजपासून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली आहे.‌’ त्यांनी जुन्नर शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या अनेक जुन्या कुटुंबांचाही उल्लेख केला.

Junnar Municipality Mayor
Cloudy Weather Banana Crop Damage: थंडीपाठोपाठ ढगाळ हवामानाचा फटका; केळी व रब्बी पिकांवर रोगराई, शेतकरी संकटात

ॲड. राजेंद्र बुट्टे पाटील यांनी सभागृहात अनुपस्थित नगरसेवकांना चिमटा काढताना, ‌‘लोकांनी तुम्हाला घरात बसण्यासाठी नव्हे, तर समाजात उतरून काम करण्यासाठी निवडून दिले आहे,‌’ असे स्पष्ट मत व्यक्त केले. मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी ‌‘नवीन नगरपालिकेच्या अपेक्षांवर खरे उतरू, तसेच सभागृहात व सभागृहाबाहेरही सर्वांना संवेदनशीलपणे ऐकले जाईल,‌’ असे आश्वासन दिले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू पाटे यांनी सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू मानून त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम नवनियुक्त नगरसेवक करतील, अशी भावना व्यक्त केली, तर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रसन्ना डोके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन पद्धतीचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून काम करण्याचे आवाहन केले. आमदार शरद सोनवणे हे मुंबई येथे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्यांनी भमणध्वनीद्वारे उपस्थित नागरिकांना संबोधित केले.

Junnar Municipality Mayor
Kedgaon Railway Passenger Problems: केडगावकरांचा रेल्वे प्रवास अडचणीत; गाड्यांची कमतरता, लोकल सेवेची तीव्र मागणी

सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा सुजाता काजळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. ‌‘जुन्नर नगरीचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून, सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख काम करणार आहे,‌’ असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक अलकाताई फुलपगार, मयूर महाबरे, विक्रम परदेशी, मंदार बुट्टे पाटील, राजश्री खोंड, सुवर्णा जाधव, समीर पुरवंत, अंजली शिंदे, रूपाली परदेशी, पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता वाघ, पिंपळवंडीच्या सरपंच मेघा काकडे, माजी नगराध्यक्ष भारती मेहेर, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश कर्पे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news