Morgaon Mayureshwar Dasara: मोरगावच्या मयूरेश्वराचा दसरा सोहळा; भाविकांसाठी नियमावली जाहीर, सुतळी बॉम्ब व फटाक्यांच्या माळांवर बंदी

सीमोल्लंघन सोहळ्यात सुरक्षिततेसाठी जय गणेश प्रतिष्ठानकडून सूचना फलक; आतषबाजीपासून अंतर राखण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन
Morgaon Mayureshwar Dasara
Morgaon Mayureshwar DasaraPudhari
Published on: 
Updated on: 

मोरगाव: अष्टविनायकांपैकी आद्य तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगाव येथील श्री मयूरेश्वराच्या राजेशाही विजयादशमी (दसरा) सीमोल्लंघन सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच मंदिर परिसरात शिस्त व सुरक्षितता राखली जावी, यासाठी जय गणेश प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून चौकात आणि मंदिराच्या दर्शनी भागात नियम व सूचनांचे फलक लावण्यात येत आहेत.

Morgaon Mayureshwar Dasara
Sinhagad Leopard Attack: सिंहगडाच्या पायथ्याला बिबट्याचा दुचाकीवर हल्ला; शेतकऱ्यासह दोन मुलींवर झडप

दसरा उत्सव सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांनी नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कोणत्याही दुर्घटनेस ग्रामस्थ मंडळी जबाबदार राहणार नाहीत, असे प्रतिष्ठानने स्पष्ट केले आहे. भाविकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, संपूर्ण परिसरावर पोलिस यंत्रणेचे बारकाईने लक्ष राहणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Morgaon Mayureshwar Dasara
Ujani Dam Fish Restoration: उजनीत ‘पाण्यातील वाघ’ परतणार! दुर्मिळ देशी माशांसह नष्ट झालेल्या पाणवनस्पतींचे पुनरुज्जीवन

भाविकांनी पाळावयाचे नियम पुढीलप्रमाणे:

  • शोभेच्या दारूची आतषबाजी सुरू असताना, तसेच शोभेच्या दारूच्या साठ्यापासून २० ते २५ फूट अंतरावर उभे राहून आतषबाजीचा आनंद घ्यावा.

  • सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी सुती (कॉटन) किंवा जाड कपडे परिधान करावेत.

  • सोहळा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी स्वतःच्या जबाबदारीवर यावे.

Morgaon Mayureshwar Dasara
Uruli Kanchan Police Constable Assault: रात्रगस्तीवरील पोलिस हवालदाराला धक्काबुक्की; उरुळी कांचनमध्ये तिघांवर गुन्हा
  • मौल्यवान दागिने परिधान करून येऊ नयेत.

  • मद्यपान किंवा धूम्रपान करून येऊ नये.

  • सोहळ्यादरम्यान वाद-विवाद, चेष्टामस्करी करू नये, तसेच ठिकठिकाणी गर्दी करून थांबणे टाळावे.

  • ग्रामस्थांनी आपले पाहुणे व नातेवाईक यांना सोहळ्यात आणताना त्यांची जबाबदारी स्वतः घ्यावी.

  • प्रशासनाच्या आदेशानुसार दसरा सोहळ्यात लवंगी, सुतळी बॉम्ब, फटाक्यांच्या माळा इत्यादींवर संपूर्ण बंदी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news