Ujani Dam Fish Restoration: उजनीत ‘पाण्यातील वाघ’ परतणार! दुर्मिळ देशी माशांसह नष्ट झालेल्या पाणवनस्पतींचे पुनरुज्जीवन

शनिवारपासून मत्स्यबीज संचयनाला प्रारंभ; डेक्कन महाशीरसह बोबरी, कवडस, रोहू, कटला, मृगल माशांचे होणार संवर्धन
Ujani dam
Ujani damPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

भिगवण: उजनीतील नामशेष व दुर्मिळ झालेल्या मत्स्य प्रजाती व पाणवनस्पती यांची पुनर्स्थापना करण्याचा प्रारंभ येत्या शनिवार (दि. १७) पासून होत आहे. यानिमित्त नदीतील वाघ म्हणून ओळखला जाणारा डेक्कन महाशीर अर्थात उजनीचा वाघदेखील परत येतोय. यासह बोबरी, कवडस, रोहू, कटला, मृगल या देशी व कार्प जातींचे मत्स्यबीज संचयन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नष्ट झालेल्या पाणवनस्पतीदेखील पुनर्स्थापना केल्या जाणार आहेत.

Ujani dam
Uruli Kanchan Police Constable Assault: रात्रगस्तीवरील पोलिस हवालदाराला धक्काबुक्की; उरुळी कांचनमध्ये तिघांवर गुन्हा

बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई (बीएनएचएस)च्या वतीने पाणथळ जागा पर्यावरण आणि पुनर्स्थापना आणि मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रमअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उजनीत वाढलेले प्रदूषण व लहान आकाराच्या जाळ्यांनी व्यावसायिक मासेमारी केल्याने जलशयातील मत्स्य संपदा पूर्णपणे धोक्यात आली आहे.

Ujani dam
MPSC Recruitment Planning: एमपीएससी भरतीचे तीन वर्षांचे वेळापत्रक ठरणार; परीक्षा, निकाल वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकारच्या सुधारणा

यातून जवळपास ३५ ते ४० जातींचे देशी मासे तसेच प्रमुख कार्प जातींचे मासे दुर्मिळ व नामशेष झाले आहेत, तर पाणवनस्पतीदेखील नष्ट झाली आहे. यामुळे जैविक साखळीदेखील धोक्यात सापडली आहे. ही बाब लक्षात घेऊन बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत देशात पहिल्यांदा बोबरी व कवडस या देशी माश्यांचे प्रजनन करण्यात यश आले आहे. काही देशी कवडस मासे नदीतून संकलन करण्यात आले आहेत. डेक्कन महाशीर मासा हा टाटा पॉवर यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Ujani dam
Pune Graduate Teachers Constituency Election: पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने दिले सुशिक्षित उमेदवार; फडणवीसांचा विश्वास

याचा शुभारंभ राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे, जहांगीर हॉस्पिटलचे प्रमुख एच. सी.जहांगीर, टाटा कंपनीचे जैवविविधता विभागाचे प्रमुख विवेक विश्वासराव, सिप्ला फाउंडेशनचे भारत विभागाध्यक्ष अनुराग मिश्रा, प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे आदींच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती पाणथळ जागा पर्यावरण पुनर्स्थापना व मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. उन्मेष काटवटे यांनी सांगितले.

Ujani dam
Pune District Central Cooperative Bank Election: पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांची चर्चा; प्रारूप मतदार यादी जाहीर

‘उजनी’चा वाघ परततोय

जलाशय व नदीत अनेक माश्यांच्या जाती असल्या तरी जंगलातील वाघाप्रमाणे नदीतील वाघ म्हणून महाशीर माश्याची ओळख आहे. हा मासा ९० च्या दशकात उजनीसह इतरही नदी व जलाशयातून जवळपास नाहीसा झाला आहे. सध्या हा मासा केवळ हिरण्यकेशी (आंबोली) नदी तसेच लोणावळा येथील टाटा पॉवरच्या जलाशयात उपलब्ध आहे. या माश्यांचे संवर्धन करण्यासाठी टाटा पॉवर गेल्या ५० वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. उजनीत टाटा पॉवर हेच या महाशीर माश्यांचे बीज उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे उजनीचा नष्ट झालेला वाघ परत तर येतोय, शिवाय या प्रकल्पामुळे उजनीचे नष्ट झालेले वैभव व मत्स्य संपदा, पाणवनस्पतीलादेखील नवसंजीवनी मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news