Sinhagad Leopard Attack: सिंहगडाच्या पायथ्याला बिबट्याचा दुचाकीवर हल्ला; शेतकऱ्यासह दोन मुलींवर झडप

१७ वर्षीय मुलीच्या पायाला ओरखडे; ससून रुग्णालयात उपचार करून घरी सोडले, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची मोहीम
Leopard Attack
Leopard Attack Pudhari
Published on: 
Updated on: 

वेल्हे: सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला खानापूर (ता. हवेली) जवळील बापुजीबुवा खिंडीत मंगळवारी (दि. १३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने मोटरसायकलवर चाललेल्या शेतकऱ्यासह दोन मुलींवर हल्ला केला. यामध्ये सुदैवाने तिघांचे प्राण वाचले. बिबट्याने सलोनी कोंडिबा थोपटे हिच्या पायाला ओरबाडले. त्यात ती जखमी झाली.

Leopard Attack
Ujani Dam Fish Restoration: उजनीत ‘पाण्यातील वाघ’ परतणार! दुर्मिळ देशी माशांसह नष्ट झालेल्या पाणवनस्पतींचे पुनरुज्जीवन

सिंहगड-राजगड-तोरणागड जवळच्या अंतराने जोडणाऱ्या खानापूर-रांजणे-पाबे रस्त्यावर घनदाट जंगलातील बापुजीबुवा खिंडीत हा प्रकार घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सिंहगड वन विभागाने बिबट्याला पकडण्याची माेहीम सुरू केली आहे. पर्यटकांसह नागरिकांना खबरदारीचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

Leopard Attack
Uruli Kanchan Police Constable Assault: रात्रगस्तीवरील पोलिस हवालदाराला धक्काबुक्की; उरुळी कांचनमध्ये तिघांवर गुन्हा

मंगळवारी सायंकाळी थोपटेवाडी येथील कोंडिबा थोपटे (वय ४८), त्यांची मुलगी सलोनी (वय १७) व तिची मैत्रीण मोना वैजनाथ राठोड (वय १८) हे तिघेजण बाजारहाट करण्यासाठी खानापूर येथे मोटरसायकलने चालले होते. बापुजीबुवा मंदिराच्या वळणातून जात असताना अचानक एक बिबट्या समोर आला. लाईटच्या उजेडाने बिबट्या सैरभैर झाला. काही क्षणातच त्याने मोटारसायकलच्या मागे बसलेल्या सलोनी हिच्या पायाला ओरखडे काढले. त्यामुळे तिने जोरदार हंबरडा फोडला.

Leopard Attack
MPSC Recruitment Planning: एमपीएससी भरतीचे तीन वर्षांचे वेळापत्रक ठरणार; परीक्षा, निकाल वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकारच्या सुधारणा

दरम्यान, आणि बाणीचा प्रसंग पाहून मोटरसायकल न थांबता कोंडिबा दोन्ही मुलींसह खानापुरात पोहचले. तेथे दवाखान्यात प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री सलोनी हिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा तिला घरी सोडण्यात आले.

वन विभागाच्या वन परिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे, वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांच्यासह वनपथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी सलोनी हिची विचारपूस केली. वन विभागाने बापुजीबुवा खिंडीसह परिसरात बिबट्या पकडण्याची माेहीम सुरू केली आहे. बिबट्या नागरी वस्त्यांत येऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Leopard Attack
Pune Graduate Teachers Constituency Election: पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने दिले सुशिक्षित उमेदवार; फडणवीसांचा विश्वास

सिंहगड किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. याठिकाणी बिबट्यासह वन्यजीवांचा अधिवास आहे. खानापूर-रांजणे, पुणे-पानशेत व इतर मुख्य रस्ते वनविभागाच्या हद्दीतून जात आहे. सायंकाळनंतर प्रवास करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

वैशाली हाडवळे,वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड वन विभाग

सिंहगडपासून पानशेतपर्यंतच्या सह्याद्रीच्या डोंगररांगात २५ ते ३० बिबट्यांचे वास्तव्य आहे. या भागात नागरिकरण वाढले आहे. रिंग रोड, फार्म हाऊस, प्लाॅटिंगमुळे बिबटे, सांबर, चितळ, रानडुक्कर आदी वन्यजीव शेतशिवारात येत आहेत. त्यामुळे वन विभागाने बिबट्यांसह वन्यजीवांच्या संरक्षणासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.

शरद जावळकर, अध्यक्ष,भाजप युवा मोर्चा, खडकवासला विधानसभा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news