Indian Student Parliament: राजकारण शुद्ध करण्यासाठी युवकांनी पुढे यावे: अनुराग ठाकूर

एमआयटीत 15 व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप; युवकांना नेतृत्वाचे आवाहन
Anurag Thakur
Anurag ThakurPudhari
Published on
Updated on

पुणे: धोरणनिर्मिती, प्रशासन आणि सार्वजनिक सेवेतील गुंतागुंत समजून तरुणांनी राजकीयदृष्ट्‌‍या कुशल, प्रशासन जाणकार आणि सामाजिक दृष्ट्‌‍या संवेदनशील बनविण्यासाठी कॅम्पसमधूनच एक नवी पिढी निर्माण होऊ शकते. राजकारणाला शुद्ध करण्यासाठी नवीन आणि सक्षम प्रतिभावान युवकांनी राजकारणात प्रवेश करावा, असे आवाहन लोकसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी केले.

Anurag Thakur
Pune POCSO Pending Cases: पुण्यात 6,537 पॉक्सो प्रकरणे प्रलंबित

एमआयटीतर्फे 15 व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार शाहिद सिद्दीकी आणि राज्यसभा खासदार डॉ. संदीप कुमार पाठक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष आणि छात्र संसदेचे संस्थापक डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.

Anurag Thakur
Pune Monsoon Preparedness: पुण्यात पावसाळ्यापूर्व आपत्ती व्यवस्थापनाची तयारी

ठाकूर म्हणाले, लोकशाही, नेतृत्व आणि सार्वजनिक धोरण याबरोबरच केवळ एआय नैतिकतेची उपेक्षा करू शकत नाही. 21 व्या शतकात कॅम्पसमधून कॅबिनेटमध्ये जाण्याचा विचार करत असाल, तर एआय नैतिकतेशी जुळवून घेतले पाहिजे. गेल्या 10 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात आमूलाग््रा बदल घडला आहे. यामध्ये आयआयटी, आयएमएम, कॉलेज, युनिव्हर्सिटी यांच्या संख्येत वृद्धी झाली आहे. आत्मनिर्भर भारतासाठी सेमी कंडक्टर, हेल्थकेअर व अन्य क्षेत्रातील अतुलनीय वृद्धी होत आहे. कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

Anurag Thakur
Pune PMC Construction Revenue Loss: तात्पुरत्या रेखांकनामुळे महापालिकेला हजार कोटींचा फटका

विश्वगुरू बनण्यासाठी युवकांनी स्वत:ला सशक्त बनवा!

शाहिद सिद्दीकी म्हणाले, विश्वगुरू बनण्यासाठी युवकांनी स्वतःला सशक्त बनवा. तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहू नये. युवकांनी केलेल्या आंदोलनामुळेच या देशात परिवर्तनाची लाट आली आहे. त्यात जेपी मूहमेंटसारख्या अनेक चळवळीचा सहभाग आहे. युवकांनी जाती-पातीच्या भिंती तोडून देशविकासासाठी कार्य करावे. देशाला बदलायचे असेल तर सर्वात प्रथम युवकांनी मानसिकता बदलावी.

Anurag Thakur
Parvati Constituency Development Proposal: पर्वतीतील 21 विकासकामांचा प्रस्ताव मागे; मिसाळ यांची नाराजी

भष्टाचार, जातीयवाद, जमातवाद दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. भारतीय छात्र संसद ही लोकशाहीमध्ये नेतृत्वाची संधी प्रदान करणारा एक उपक्रम आहे. राजकारणाचे प्रशिक्षण देणारी ही पहिली शैक्षणिक संस्था आहे. आमचा प्रयत्न चांगल्या आणि सुशिक्षित तरुणांना राजकारणात आणण्याचा आहे.

डॉ. राहुल विश्वनाथ कराड, संस्थापक, छात्र संसद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news