Minor Girl Assault: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस सक्तमजुरी

भिगवण येथील घटना; इंदापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
Minor Girl Assault
ल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस सक्तमजुरीPudhari
Published on
Updated on

इंदापूर : भिगवण (ता. इंदापूर) येथे अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना शाळेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन ढकलून देत गळ्याला हात लावून विनयभंग केल्याप्रकरणी एकास पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा इंदापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.(Latest Pune News)

Minor Girl Assault
Adarshanagar Road Repair: प्रशासनाचे दुर्लक्ष; माजी सरपंचांनी निर्माण केला आदर्श

सागर भीमराव शेलार (वय 33, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार भिगवण येथे 30 नोव्हेंबर 2016 रोजी घडली होता. याबाबत पीडित बालिकेने भिगवण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Minor Girl Assault
Girls Education Panchet: खडतर संघर्षानंतर तीनशे गरीब युवतींच्या आयुष्याला रचनात्मक पैलू

फिर्यादीप्रमाणे दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी पीडिता शाळेत जात असताना आरोपी सागर शेलार हा पीडितेच्या शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आला व पीडितेशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. पीडिता घाबरून पुढे जात असताना आरोपीने मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून तिच्या पाठीमागून येऊन तिचा उजवा हात मागे ओढला. त्यामुळे पीडितेने घाबरून रडण्यास सुरूवात केली. त्यावेळेस पीडितेच्या गळयाला हात लावून ढकलून देऊन तिला अश्लील बोलून तिच्याकडे घाणेरड्या नजरेने बघू लागला. या वेळी तेथे लोक आल्याने आरोपी तेथून पळून गेला. याप्रमाणे पीडीतेच्या फिर्यादीवरून भिगवण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Minor Girl Assault
ABVP Office Attack Pune: ॲक्शनवर ‌‘रिॲक्शन‌’ होणारच : अमित ठाकरे

या गुन्ह्याचा तपास भिगवणचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एन. एम. राठोड यांनी केला. त्यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. खटल्याची सुनावणी प्रथम बारामती येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व नंतर इंदापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे इंदापूरचे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी कामकाज पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राह्य धरून इंदापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-1 यांनी आरोपी सागर शेलार यास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Minor Girl Assault
Diwali fashion designer trend: यंदा फॅशन डिझायनरच्या कपड्यांची क्रेझ

या प्रकरणात सरकार पक्षास पैरवी अधिकारी सहायक फौजदार ए. जे. कवडे तसेच भिगवण पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक निश्चल शितोळे यांनी सहकार्य केले.

Minor Girl Assault
Synthetic Intelligence | कृत्रिम बुद्धिमत्तेनंतर (AI) आता ‘सिंथेटिक इंटेलिजेन्स’ची (SI) चर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news