

पुणे : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत १७ वर्षीय मुलीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदित्य जनार्दन बेले (वय २०, रा. कलवडवस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेले आणि पीडित मुलीची ओळख झाली होती. त्याने तिच्याशी मैत्री केली. सुरुवातीला तिने मैत्री करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याने तिच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर त्याने पीडितीची छायाचित्रे मोबाइलमध्ये काढली. छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला.