

पुणे : धायरीतील कोळेश्वर मंदिराजवळील गिरीजा हॉटेल समोर गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला काहीएक कारण नसताना शिवीगाळ करून दगडाने व कुंडी डोक्यात घालून मारहाण करणाऱ्या एकाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली.
हा प्रकार 7 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. गौरव राजू घाडगे (वय 19, रा. वडगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे साथीदार सोन्या हिवाळे, यश देसाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रसाद गणेश भोपकर (वय 33, रा. शिवअपार्टमेंट, रायकरनगर धायरी) यांनी याबाबत नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.