MHT CET 2026 Registration: आधार व अपार आयडीशिवायही एमएचटी सीईटी २०२६ अर्ज भरण्याची मुभा

तांत्रिक अडचणींमुळे सीईटी सेलचा दिलासा; २० फेब्रुवारीपर्यंत नोंदणी, एप्रिल-मे दरम्यान परीक्षा
MHT CET
MHT CETPudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने 2026 च्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. तांत्रिक अडचणींमुळे आधार किंवा अपार आयडी नसलेले विद्यार्थी आता त्याशिवायही एमएचटी सीईटीचा अर्ज भरू शकतात. ही सवलत 13 फेबुवारी 2026 पासून लागू झाली असून, विद्यार्थी अधिकृत वेबसाइट https://cetcell.mahacet.org/ वर जाऊन अर्ज करू शकतात.

MHT CET
SPPU Teacher Recruitment Deadline: ५० टक्के मान्यताप्राप्त प्राध्यापक अनिवार्य; अन्यथा प्रवेशबंदीचा इशारा

सीईटी सेलला असे आढळून आले की, काही उमेदवारांना सीईटी 2026 नोंदणी प्रक्रियेदरम्यान आधार आणि अपार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. तांत्रिक किंवा इतर खऱ्या समस्यांमुळे आधार आणि अपार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात अक्षम असलेल्या उमेदवारांना आधार आणि अपार प्रमाणीकरणाशिवाय नोंदणी पोर्टलवर अर्ज भरून सबमिट करण्यास मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

MHT CET
Maharashtra CET 2026 Registration: एलएलबी, बीएड-एमएड व बीपीएड सीईटी नोंदणीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

जे उमेदवार आधार आणि अपार प्रमाणीकरण वापरून नोंदणी फॉर्म भरू शकतात त्यांनी पूर्वसूचित नोंदणी प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. एमएचटी सीईटी नोंदणी 20 फेबुवारी 2026 रोजी बंद होईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा 11 एप्रिल ते 26 एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 10 ते 17 मे 2026 दरम्यान होईल. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होईल. पहिले सत्र सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरे सत्र दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळेत होईल. अधिक माहितीसाठी उमेदवार सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

MHT CET
Pune RTE Admission: पुण्यात आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात

...असा करा अर्ज

परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम सीईटी सेलचे अधिकृत वेबसाइट लशींलशश्रश्र.ारहरलशीं.ेीस ला भेट द्यावी. होम पेजवर उपलब्ध असलेल्या एमएचटी सीईटी नोंदणी लिंकवर क्लिक करा. तिथे एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना नोंदणी तपशील प्रविष्ट करावे लागतील.

MHT CET
Legal MSP For Farmers India: सर्व शेतमालाला कायदेशीर हमीभाव द्या; एफआरपी न दिल्यास कारखान्यांवर गुन्हा दाखल करा

त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा आणि पेजवर लॉगिन करा. अर्ज भरताना विचारलेला संपूर्ण तपशील भरा आणि अर्ज शुल्क अर्ज पूर्ण करा. सबमिटवर क्लिक करा आणि कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करा. पुढील आवश्यकतेसाठी अर्जाची एक प्रिंट काढून घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news