

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी एलएलबी (3 वर्षीय), बीएड-एमएड (3 वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) व बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (बीपीएड) या अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीला 28 फेबुवारीपर्यंत मुदतवाढ केली आहे.
आत्तापर्यंत एलएलबीला (3 वर्षीय) 62,500 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बीएड-एमएड्साठी (3 वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) 850 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बीपीएड या अभ्यासक्रमास 4,279 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
एलएलबी (3 वर्षीय) या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 1 एप्रिल 2026 ते 2 एप्रिल 2026 दरम्यान होणार आहे. बीएड- एमएड (3 वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 9 एप्रिल 2026 रोजी होणार आहे, तर बीपीएड या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 4 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. याची फिल्ड परीक्षा 5 एप्रिल ते 7 एप्रिल 2026 रोजी होणार आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या ुुु.ारहरलशीं.ेीस या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन घेतल्या जातील.
विधी पाच वर्षे सीईटीसाठी मुदतवाढ
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी एलएलबी (5 वर्षीय) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीला 15 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ करण्यात येत आहे. एलएलबी (5 वर्षीय) या अभ्यासक्रमास 26 हजार 61 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर, या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 8 मे 2026 रोजी होणार आहे. 2025 च्या एलएलबी (5 वर्षीय) सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये 35 हजार 74 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.