MHT CET 2026 Registration: एमएचटी सीईटीसाठी 11.42 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

पीसीएम-पीसीबी समूहासाठी दोन संधी; अर्ज दुरुस्तीची सुविधा 7 मार्चपर्यंत उपलब्ध
MHT CET
MHT CETPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग््रेाटेड) व ॲग््रािकल्चर एज्युकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम समूह व पीसीबी समूह प्रवेश परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या दोन्ही संधी मिळून 11 लाख 42 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

MHT CET
Bullet Modified Silencer Action: पुण्यात बुलेटच्या मॉडीफाईड सायलेन्सरवर रोडरोलर

2026 च्या एमएचटी सीईटी पीसीएम समूह व पीसीबी समूह प्रवेश नोंदणीला दिनांक 10 जानेवारी 2026 पासून सुरुवात झाली होती व नोंदणीची अंतिम तारीख दिनांक 12 फेबुवारी होती. याला दिनांक 20 फेबुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच, दुसरी व अंतिम मुदतवाढ दिनांक 24 फेबुवारीपर्यंत करण्यात आली होती. यानंतर विलंब शुल्कासह दिनांक 25 ते 27 फेबुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

MHT CET
CET Registration Extension: बीबीए-बीसीएसह 7 अभ्यासक्रमांच्या CET नोंदणीस मुदतवाढ

पीसीएम व पीसीबी समूहाच्या या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क अदा करून पूर्ण केलेली आहे. त्यांपैकी काही विद्यार्थांकडून अर्ज भरताना अनवधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्तीसाठीची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुरुस्तीची सुविधा दिनांक 5 मार्च ते 7 मार्च 2026 दरम्यान उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MHT CET
RTE Admission Rule: आरटीई प्रवेश नियमाविरोधात पुण्यात आंदोलन

विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात त्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग, पीसीएम किंवा पीसीबी समूह समाविष्ट करणे, दुसरी संधी समाविष्ट करणे यामध्ये दुरुस्ती व बदल करण्याची सुविधा देण्यात येत आहे. एमएचटी सीईटी (पीसीएम समूह ) पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा 11 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल 2026 दरम्यान घेतली जाणार आहे, तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा 14 मे 2026 ते 17 मे 2026 दरम्यान होणार आहे. एमएचटी सीईटी (पीसीबी समूह ) पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा 21 एप्रिल 2026 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान घेतली जाणार आहे, तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा 10 मे 2026 ते 11 मे 2026 दरम्यान होणार आहे. ही सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील.

MHT CET
Pune Airport Drug Smuggling: पुणे विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; बाथरूममधून 74.5 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

पीसीएम समूहाच्या नोंदणीमध्ये 10 हजारांनी वाढ

प्रवेश नोंदणीमध्ये पीसीएम समूहाची नोंदणी मागील वर्षापेक्षा जास्त झाली असून, 2025 च्या एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) या प्रवेश परीक्षेमध्ये 4 लाख 64 हजार 262 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी ही नोंदणी पहिल्या संधीसाठी 4 लाख 74 हजार 656 झाली असून, ही वाढ 10 हजार 394 ने जास्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news